मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित भजन संध्या कार्यक्रम पाहण्यासाठी मुंबईकरांची प्रंचड गर्दी

मुंबई ( २ ऑक्टोबर ) : मुंबई विद्यापीठातर्फे सोमवारी विश्व अंहिसा दिनानिमित्त भजन संध्या या कार्यक्रमाचे आयोजन गेट वे ऑफ इंडिया येथे करण्यात आले. हा कार्यक्रम पाहण्यासाठी मुंबईकरांनी प्रंचड गर्दी केली होती.

भजन संध्या कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागाचे प्रमुख डॉ. कुणाल इंगळे, प्राध्यापक भूषण नागदिवे आणि संगीत विभागाचे विद्यार्थी हरगुण कौर, मयूर सुकाळे, राजेश देवल, अनुपम बर्मन, मिलिंद सिंह, सौरभ वाखरे, ऋतिका बोरकर, रसिका बोरकर आदींनी भजन, किर्तन आणि देशभक्तीपर गीते सादर केली.

प्रमुख अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे उपस्थित होते. तसेच विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील, सांस्कृतिक विभागाचे समन्वयक निलेश सावे आणि एनएसएस विभागाने अथक प्रयत्न केले. कार्यक्रमाचे समालोचन प्राध्यापक नितिन आरेकर यांनी केले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget