राष्‍ट्रपती राम नाथ कोविंद यांच्‍या हस्‍ते शिर्डी विमानतळाचे लोकार्पण

शिर्डी, ( १ ऑक्टोबर ) : राष्‍ट्रपती राम नाथ कोविंद यांच्‍या हस्‍ते शिर्डी आंतरराष्‍ट्रीय विमानतळाचे लोकार्पण करण्‍यात आले. राष्‍ट्रपती महोदयांनी शिर्डी-मुंबई विमानसेवेचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.

सकाळी 10 वाजता विमानतळावर कोविंद यांचे आगमन झाल्‍यानंतर राज्‍यपाल चे.विद्यासागर राव आणि मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्‍यांचे स्‍वागत केले. यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपति राजू, पालकमंत्री प्रा.राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे-पाटील, जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा शालिनी विखे- पाटील, महाराष्‍ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्‍यवस्‍थापकीय संचालक सुरेश काकाणी, विभागीय आयुक्‍त महेश झगडे, जिल्‍हाधिकारी अभय महाजन आदी उपस्थित होते.

राष्‍ट्रपती कोविंद यांच्‍या हस्‍ते कोनशिलेचे अनावरण करण्‍यात आले. त्‍यांनी विमानतळ इमारत परिसराची पाहणी केली. उद्घाटनानंतरच्‍या पहिल्‍या शिर्डी-मुंबई विमानाने १२ प्रवाशांनी प्रवास केला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget