'मार्केटिंग-द ट्रिक्स ऑफ द ट्रेड दे वोन्ट टीच यू अ‍ॅट बी-स्कूल्स' मार्केटिंग गुरू अदित चौहान यांचे पहिले पुस्तक लाँच


मार्केटिंगचे विद्यार्थी, नवीन मार्केटिंग व्यावसायिक आणि तरुण उद्योजक यांना मार्गदर्शक ठरणारे अशा प्रकारची पहिलीच रेडी रेकनर पुस्तिका

पुणे : ज्यावेळी त्यांच्या मार्केटिंगचा प्रश्‍न असतो तेव्हा माध्यमे आणि मार्केटिंग समूहांमधील प्रगतीसह व्यावसायिक कोणतीच गोष्ट करण्यावाचून राहत नाहीत. पण, हे ते योग्यपद्धतीने करत आहेत का? विशेषत: छोटे उद्योजक आणि अडचणीतले स्टार्टअप्स? सध्या जोरात असलेल्या स्टार्ट अप ट्रेंडमध्ये प्रत्येक जण स्वत:चे अस्तित्व दाखवू पाहतो आहे.

हा सर्वमार्केटिंग-मॅनेजमेंटचा गोंधळ सोडविण्यासाठी अदित चौहान या नामवंत मार्केटिंग गुरूने नुकतेच ’मार्केटिंग-द ट्रिक्स ऑफ द ट्रेड दे वोन्ट टीच यू अ‍ॅट बी-स्कूल्स’ हे आपले पहिले पुस्तकपुणे येथे लाँच केले आहे. या कार्यक्रमाच्या वेळी सिंबायोसिसचे संस्थापक आणि अध्यक्ष पद्मभूषण डॉ. डॉ. एस. बी. मुजुमदार, मर्सिडीझ बेंझ इंडियाच्या विपणन विभागाचे सरव्यवस्थापकआणि सीआरएम अमित थेटे, झेबेक कम्युनिकेशन्स च्या व्यवस्थापकीय संचालक किरण भट, ईशान्य चे सीईओ महेश एम असे या क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.सर्वांसाठी खुल्या असलेल्या या कार्यक्रमात पुस्तकाच्या लाँचनंतर बी-स्कूल्समधील मार्केटिंग प्रशिक्षण आणि प्रत्यक्षातील कॉर्पोरेट क्षेत्राच्या गरजा यातील अंतर कापणे या विषयावरपरिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यात लेखकाने स्वत: निवडलेल्या तज्ज्ञांनी सहभाग घेतला. श्रोत्यांनाही या परिसंवादात भाग घेण्याची आणि मार्केटिंग क्षेत्रासंबंधी शंकाविचारण्याची संधी मिळाली.

अदित यांनी या पुस्तकातील क्रमवार मार्गदर्शक सूचनांमधून मार्केटिंगची संकल्पना, नियोजन आणि अंमलबजावणी यांचे स्पष्टीकरण केले आहे, जे मार्केटिंगचे विद्यार्थी, नवीनमार्केटिंग व्यावसायिक आणि तरुण उद्योजक यांना मार्केटिंगचे प्रत्यक्ष ज्ञान मिळवण्यासाठी आणि त्यांच्या करिअरला गती देण्यासाठी उपयुक्त ठरेल. हे पुस्तक म्हणजे मार्केटिंगयाविषयावरचे प्रात्यक्षिक गाईड म्हणून वापरता येईल असे रेडी रेकनर हँडबुक आहे. अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील, फ्लिपकार्ट आणि भारतभरातील सर्व प्रमुख ऑफलाईन दुकाने याठिकाणी हेपुस्तक उपलब्ध असून त्याला फ्लिपकार्ट, टाईम्स नेटवर्क, अमिटी बिझनेस स्कूल, मोबिक्विक, सीआयबीए आणि इंडस बिझनेस अ‍ॅकॅडमी अशा संस्थांसोबत काम करणार्‍या याक्षेत्रातील दिग्गज लोकांकडून कौतुकाची पावती मिळाली आहे. भविष्यात उद्योगक्षेत्रासाठी उत्तम मार्केटर्स तयार करण्यासाठी प्रत्येक बी-स्कूलच्या अभ्यासक्रमात स्थान मिळवणे हे रुपापब्लिकेशन्स ने प्रकाशित केलेल्या हे पुस्तकाचे ध्येय आहे.

या पुस्तकाचे लेखक आणि नामवंत मार्केटिंग गुरू अदित चौहान यावेळी म्हणाले, कोणतेही मॅनेजमेंट स्कूल नवोदित व्यावसायिकाला खर्‍या जगातील आव्हानांसाठी तयार करत नाही.बहुतांश व्यवसायिक अभ्यासक्रम हे केवळ मार्केटिंगचे सैद्धांतिक ज्ञान देण्यावरच समाधान मानतात. हे महत्तवपूर्ण अंतर भरून काढण्यासाठी हे पुस्तक मार्केटिंगची धोरणे, नियोजनआणि अंमलबजावणी यांच्यासाठी व्यावहारिक युक्त्या सुचवते. या विषयावर उपलब्ध असलेल्या शेकडो सैद्धांतिक पुस्तकांच्या अगदी उलट हे पुस्तक म्हणजे मार्केटिंगच्या प्रत्यक्षातीलबाजूवर प्रकाश टाकणारे तयार मार्गदर्शक आहे. आणि मला असे वाटते की मार्केटिंगच्या क्षेत्रात करिअर घडवू पाहणारे मॅनेजमेंटचे विद्यार्थी, कामाला सुरुवात केलेले नवोदित मार्केटिंगव्यावसायिक आणि मार्केटिंगबाह्य क्षेत्रांतून आलेले उगवते उद्योजक यांच्यासाठी फारच उपयुक्त ठरेल.

या वेळी सिंबायोसिसचे संस्थापक आणि अध्यक्ष पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे मार्केटिंग या विषयावर पुस्तक लिहिणारा अदित हा सिंबायोसिसचापहिलाच माजी विद्यार्थी आहे. सिद्धांत हे नेहमीच महत्त्वाचे असले, तरी त्याच्या या पुस्तकाने मार्केटिंगचे अनेक व्यवहारिक पैलू तपशीलवारपणे मांडले आहेत जे विद्यार्थीआणि मार्केटर्स यांना नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत आणि नंतर विश्‍लेषण करण्यासाठीही मार्गदर्शन करतील, असे मला वाटते. त्याची लेखनशैलीही खेळकर, संवादात्मक आणिअजिबात कंटाळवाणी न होणारी अशी आहे.

मर्सिडीझ बेंझ इंडियाच्या विपणन विभागाचे सरव्यवस्थापक आणि सीआरएम श्री. अमित थेटे म्हणाले की एखाद्याच्या थेट अनुभवातून आलेले मार्केटिंगच्या मूलभूत बाबींवरचे हेसाहित्य पाहणे ही आनंदाची गोष्ट आहे. नवोदित व्यावसायिकांसाठी अत्यंत सुसंबद्ध आणि सुयोग्य असे हे पुस्तक तरुण मार्केटर्सना खर्‍या व्यववसायिक विेशात प्रवेश करताना योग्यअशा मार्गदर्शकाची भूमिका वठवू शकेल. अदितची सुलभ लेखनशैली त्यातील विषय समजून घेणे सोपे बनवते.

टाईम्स नेटवर्कचे वरिष्ठ उपाध्यक्ष हेमंत अरोरा यांच्या मते, हे पुस्त्क सिद्धांत किंवा 35,000 फूट दृष्टिकोन मांडत नाही, तर प्रत्येक प्रकरणात मार्केटिंगच्या प्रत्यक्षातील सत्यता मांडते.मार्केटिंगची मूलभूत तत्त्वे यातील प्रत्येक प्रकरणाच्या स्वरुपात एका क्रमवार, तर्कपूर्ण पद्धतीने समोर येतात, जेणेकरून त्यातील प्रत्येकावर लक्ष केंद्रित करून एखाद्यालामार्केटिंगमधील कौशल्य प्राप्त करून घेता येऊ शकेल. मार्केटिंग नावाच्या धर्माचा भाग असणार्‍या आणि बनू पाहणार्‍या प्रत्येकाने घेतलेच पाहिजे, असे हे पुस्तक आहे.

फ्लिपकार्ट मिडीयाचे प्रमुख प्रसीद प्रसाद म्हणाले, अदितसारख्या तरुण तज्ज्ञांकडून अशी पुस्तके येताना पाहणे ही आनंदाची गोष्ट आहे, कारण ते नक्कीच नव्या युगातील मार्केटिंगलानवीन दृषिटकोन देउ शकतात.

अमिटी बिझनेस स्कूल, पुणे/मुंबई चे सरसंचालक कर्नल (डॉ.) स्नेह व्ही वर्मा म्हणाले, हे पुस्तक मॅनेजमेंटचे विद्यार्थी, व्यावसायिक आणि उद्योजक यांच्यासाठी अतिशय कल्पक वउपयुक्त आणि आपले करिअर सुरू करणार्‍या मार्केटिंग व्यवसायिकांसाठी उत्तम मार्गदर्शक ठरेल असेच आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे ते मार्केटिंगच्या संकल्पनांचे व्यावहारिक’जाणून घ्या-कसे’ असे रुप दाखवते आणि मार्कटिंगच्या तथाकथित परिभाषेच्या पलिकडे जाउन बरेच काही सांगते.

सेंटर फॉर इनक्युबेशन अॅन्ड बिझनेस अ‍ॅक्सीलरेशन (सीआयबीए), नवी मुंबई चे सीईओ प्रसाद मेनन यांनीही आपले विचार मांडले. अदित चौहान यांची नो नॉनसेन्स निवेदनशैली तुम्हीत्यांच्यासोबत एखाद्या कॅफेमध्ये बसला आहात आणि ते तुम्हाला तुमचा मार्कट्रिग जॉब सुरु करण्यासाठी आतल्या गोषटी सांगत आहेत असा आभास निर्माण करते. सर्व मॅनेजमेंटचेविद्यार्थी, इंटर्न्स, नवे मार्केटर्स, नवोदित उद्योजक यांना त्याच्या या थेट मार्गदर्शनातून आणि युक्त्यांमधून त्यांच्या मार्केटिंग योजनांचे नियोजन आणि त्यांची अंमलबजावणी यासाठीफायदा होईल.

इंडस बिझनेस अ‍ॅकॅडमी बंगळुरूचे संस्थापक आणि सीईओ मनीष जैन यांच्या मते, हे मार्कटिंग या विषयावरचे सुरस पुस्तक आहे. यातील संवाद अत्यंत स्पष्ट आणि समजण्यास सोपेआहेत. मिडिया मार्केटिंगमधील मूलभूतपासून तपशीलवार बाबींचा परामर्श घेण्यात लेखकाला यश आले आहे. मिडिया आणि डिजिटल मार्केटिंगमधील उत्सुक वाचकांनी वाचलेच पाहिजेअसे हे पुस्तक आहे.

अदित चौहान यांच्याबद्दल : अदित चौहान यांनी एका दशकाहूनही जास्त काळ मार्केटर म्हणून काम केले आहे आणि त्यांच्याकडे रिटेल, रिअल इस्टेट, इव्हेंट्स, आउटडोअर मिडियाआणि बिझनेस कन्सल्टिंग अशा विविध क्षेत्रांतला उत्तम अनुभव आहे. सध्या अदित हे पुणे येथे क्लिक्स टेक्नॉलॉजीज नावाची डिजिटल मार्केटिाग फर्म चालवतात आणि त्याचबरोबरस्टाईल माय लाईफ हे लाईफस्टाईल सर्व्हिसेसवर आधारित सोशल कॉमर्स स्टार्ट अपही चालवतात. एज्युप्रिस्टाईन येथे व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणूनही ते कार्यरत आहेत आणि कार्यरतव्यावसायिकांना डिजिटल मार्केटिंगचे प्रशिक्षण देतात. त्यांच्या नेटवर्कमधून त्यांच्यापर्यंत पोहोचणार्‍या मोजक्याच क्लासयंट्सना ते मार्केटिंग सल्लाही देतात.

इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअर असलेले अदित यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेलिकॉम मॅनेजमेंट, पुणे मधून मार्केटिंग अँड कम्युनिकेशनया विषयात पूर्ण केले आणि डिजिटल मार्केटिंग आणि कोचिंगच्या क्षेत्रात पदार्पण केले. वृत्तीने व्यावसायिक असलेले अदित यांना संधी मिळेल त्यावेळी इव्हेंट्सचे आयोजन करणेहीआवडते.

हे पुस्त्क आणि लेखकाविषया अधिक माहिती www.aditchouhan.com इथे मिळेल.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget