मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी ‘महाडीबीटी’वर अर्ज करावेत

मुंबई ( ७ नोव्हेंबर ) : अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गामधील पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षणशुल्क, परीक्षा शुल्क, निर्वाह भत्ता व इतर अनुज्ञेय फीचा लाभ मंजुरीसाठी लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण योजना (DBT) लागू करण्यात आली आहे. या अनुषंगाने अनुसूचित जाती, विजा, भज, इमाव व विमाप्र या प्रवर्गासाठी अनुज्ञेय फीचा लाभ मिळण्यासाठीचे अर्ज भरण्यासाठी वित्तीय वर्ष 2017-18 पासून https://mahadbt.gov.in हे संकेतस्थळ विकसित
करण्यात आले आहे.

सर्व संबंधितांनी उपरोक्त संकेतस्थळावर त्यांचे अर्ज तात्काळ अपलोड करण्याची कार्यवाही करावी. या संबंधी काही तांत्रिक अडचणी किंवा शंका उद्भवल्यास टोल फ्री क्र. 18001025311 किंवा mahadbt.helpdesk@maharashtra.gov.in या ई-मेलवर संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर यांनी कळविले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget