मुंबई ( २५ नोव्हेंबर ) : रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे तसेच दैनिक सम्राट चे संपादक बबनराव कांबळे, युनायटेड बुध्दिस्ट फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश कांबळे यांनी लंडन येथे स्कूल ऑफ इकाॅनाॅमिक्स तसेच इंडियन हाय कमिशन येथे आज भेट देऊन विश्व वंदनीय डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालुन अभिवादन केले.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे प्रतिनिधी म्हणून चंद्रशेखर कांबळे तसेच बबनराव कांबळे, अविनाश कांबळे यांना लंडन येथील आंबेडकर मेमोरियल ट्रस्टच्यावतीने लंडन येथील युनायटेड किंगडम येथे संविधान दिवस साजरा करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच ते आंबेडकर हाऊस येथील कार्यक्रमात देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
टिप्पणी पोस्ट करा