मंत्रिमंडळ बैठक ( ७ नोव्हेंबर ) : पुणतांबा गावाच्या पाणीपुरवठा योजनेसाठी शेती महामंडळाची जमीन देण्यास मान्यता

मुंबई ( ७ नोव्हेंबर ) :अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा गावाच्या नळपाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची ३.७७ हेक्टर जमीन कब्जेहक्काने देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे पुणतांबा परिसरातील पाणी टंचाईचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.

पुणतांबा (ता. राहता) गावाच्या प्रस्तावित नळ पाणीपुरवठा योजनेमध्ये साठवण तलाव, जलशुद्धीकरण केंद्र, मुख्य संतुलन जलकुंभ आणि कर्मचारी निवासस्थाने यांचा समावेश आहे. या योजनेसाठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या पुणतांबा येथील गट क्रमांक २६३ मधील जमिनीची मागणी करण्यात आली आहे. एक विशेष बाब म्हणून चालू वार्षिक दर विवरणपत्रातील दरावर आधारित बाजारमूल्याच्या 10 टक्के रक्कम आकारुन ही शेतजमीन पुणतांबा ग्रुप ग्रामपंचायतीस कब्जेहक्काने देण्यास मान्यता देण्यात आली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget