(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); तरुण शेतकरी मंत्रालयातील विस्तारीत इमारतीमधील 7 व्या मजल्यावर चढला | मराठी १ नंबर बातम्या
" />

तरुण शेतकरी मंत्रालयातील विस्तारीत इमारतीमधील 7 व्या मजल्यावर चढला

मुंबई ( १० नोव्हेंबर ) : शिक्षण मंत्री विनोद तावडे, गृह राज्यमंत्री(ग्रामीण) दीपक केसरकर, गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांच्या शिष्टाईने ज्ञानेश्वर साळवे हा आंदोलनकर्ता तरूण सुखरुपपणे उतरला.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द येथील तरुण शेतकरी साळवे हा मंत्रालयातील विस्तारीत इमारतीमधील 7 व्या मजल्यावर चढला होता. ही माहिती समजताच पोलीस, अग्निशामक दल, मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांनी तात्काळ धाव घेऊन त्याला खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. जंम्पींग सिटही यावेळी लावण्यात आले होते.

तावडे, केसरकर, डॉ. पाटील यांनी या ठिकाणी धाव घेऊन ज्ञानेश्वर साळवे यांच्याशी चर्चा सुरु केली. या यशस्वी चर्चेनंतर त्यांना सुखरुपपणे उतरविण्यात आले.

या तरुणाचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नव्हता, त्याने कृष्णा खोऱ्यातील शेतक-यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मांडला, शेतीला हमीभाव मिळत नसल्याची तक्रार केली तर स्वामीनाथन शिफारशींच्या अंमलबजावणीची मागणी केली, त्याची स्वत:ची तीन एकर शेती असून त्यात त्याला म्हणावे तसे उत्पन्न मिळाले नाही, अशी ही त्याची तक्रार होती, त्याच्या सर्व मागण्या रास्त होत्या. मात्र तरुणाने आपल्या जीवावर बेतेल असे आंदोलन करू नये, अशी प्रतिक्रिया तावडे यांनी दिली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget