(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मंत्रालयात 30 नोव्हेंबरला रक्तदान शिबिर | मराठी १ नंबर बातम्या
" />

मंत्रालयात 30 नोव्हेंबरला रक्तदान शिबिर

मुंबई ( २८ नोव्हेंबर ) : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गुरुवार दि ३० नोव्हेंबर रोजी मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. मुंबई व महाराष्ट्रातील रक्ताचा तुटवडा विचारात घेऊन मंत्रालयातील सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी या रक्तदान शिबिरामध्ये उस्फुर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांनी आज येथे केले.

मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आरोग्यमंत्र्यांची आज भेट घेतली. काही दिवसांपुर्वी आरोग्यमंत्र्यांच्या पुढाकाराने मंत्रालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मानसिक ताण तणाव व्यवस्थापनाबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

येत्या काही दिवसात नामांकित खासगी रुग्णालयांच्या सहयोगातून मंत्रालयात वैद्यकीय तपासणी शिबीर आयोजित करण्यात येणार असून त्यात अधिकारी कर्मचाऱ्यांची सर्वंकष तपासणी तसेच सवलतीच्या दरात शस्रक्रिया करण्यात येतील, असे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

आजच्या बैठकीत आरोग्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंत्रालयातील विविध अधिकारी कर्मचारी संघटनांनी यात सहभागी होणार असल्याचे सांगितले. रक्तदानापोटी शासन निर्णयानुसार एक विशेष नैमित्तिक रजा कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. या रक्तदान शिबिरात सहभागी होणार असल्याचे मंत्रालय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दत्ताराम कुंभार, मंत्रालय अधिकारी संघटनेचे अध्यक्ष रा.को. धनावडे, शासकीय वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष संजय दळवी, मंत्रालय चतुर्थ श्रेणी संघटनेचे खजिनदार विजय अपराध यांनी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget