(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); येत्‍या रविवारपासून सुरु होणाऱया “खुले व्‍यासपीठ” कार्यक्रमास कलाकारांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद | मराठी १ नंबर बातम्या
" />

येत्‍या रविवारपासून सुरु होणाऱया “खुले व्‍यासपीठ” कार्यक्रमास कलाकारांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

२१ कलाकार / संस्‍थांनी केली नोंदणी

मुंबई ( १४ नोव्हेंबर ) : बृहन्‍मुंबई महापालिका व महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी संयुक्‍तपणे दिनांक १९ नोव्‍हेंबर, २०१७ पासून मे, २०१८ अखेरपर्यंत दर रविवारी होणाऱया “खुले व्‍यासपीठ” या संकल्‍पनेतून मुंबई शहराची ओळख संपूर्ण जगभर पोहचविण्‍यासाठी महत्‍वपूर्ण भूमिका बजावणार असल्‍याने २१ कलाकार / कला संस्‍थांनी आजपर्यंत या महोत्‍सवात सहभागी होण्‍यासाठी नोंदणी केल्‍या असून ११ जणांनी प्रत्‍यक्ष सहभागी होण्‍याबाबतची कार्यवाही पूर्ण केली आहे. विविध कलागुणांना वाव मिळावा म्‍हणून महापालिका आयुक्‍त अजोय मेहता यांच्‍या मार्गदर्शनाखाली सदर संकल्‍पना प्रत्‍यक्षात साकारत आहे. अशा व्‍यासपीठामुळे मुंबई शहराच्‍या पर्यटनाला विशेषतः भारतीय पर्यटनाला अत्‍यंत पोषक असे वातावरण तयार करण्‍यासाठी महापालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्‍न करीत असल्‍याचेही आयुक्‍त मेहता यांनी सांगितले.

या ११ जणांमध्‍ये ‘बॉलिवूड’ चे संतोष मिजगर यांनी ८ जागांची नोंदणी केली असून ते बॉलिवूडवरील थिम साकारणार आहेत. तसेच सुप्रसिद्ध व्‍यंगचित्रकार विकास सबनीस हे व्‍यंगचित्रे साकारणार आहेत, तर
श्रीमती रुपाली मदन या ‘स्‍केच आर्टिस्‍ट’ वर कला सादर करणार आहेत. 

सांस्‍कृतिक, कला, नाटय़, चित्रपट, संगीत, फॅशन, महाराष्‍ट्रीय तसेच भारतीय लोकनृत्‍यांचे विविध प्रकार मुंबईकर नागरिक व मुंबईला भेट देणाऱया देश-विदेशातील पर्यटकांना पाहता यावेत म्‍हणून सदर व्‍यासपीठ हे
प्रथमच उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे. या विविध क्षेत्रांतील कलाकारांना आपापली कला या व्‍यासपीठावर रविवार, दिनांक १९ नोव्‍हेंबर, २०१७ रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० दरम्‍यान सादर करता येणार आहे.

के. दुभाष मार्गावर ज्‍या ठिकाणी सदर “खुले व्‍यासपीठ” असणार आहे, त्‍या रस्‍त्‍यावरील वाहनतळ शनिवार, दिनांक १८ नोव्‍हेंबर, २०१७ दुपारनंतर बंद करण्‍यात येणार असून रविवार, दिनांक १९ नोव्‍हेंबर, २०१७ सायंकाळपर्यंत सदर वाहनतळ बंद राहील, असे महापालिकेने कळविले आहे. या ठिकाणी असलेले इतर वाहनतळ नेहमीप्रमाणेच वाहनांच्‍या पार्किंगसाठी उपलब्‍ध राहणार असल्‍याचेही पालिकेने कळविले आहे.

अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त (शहर) ए. एल. जऱहाड यांनी दिलेल्‍या आदेशानुसार चौक व आजुबाजूच्‍या पदपथांची दुरुस्‍ती, चौकाची रंगरंगोटी व वृक्ष फाद्यांची छटाई ही कामे पूर्ण करण्‍यात आली असून सदर परिसर हा आकर्षक दिसेल याबाबत प्राधान्‍य देण्‍यात येत आहे.

तसेच या कलाकारांच्‍या विविध कलागुणांना प्रोत्‍साहन मिळावे, यासाठी मुंबई शहराचा सांस्‍कृतिक वारसा वृद्धि‍गत करण्‍यासाठी महत्‍वपूर्ण योगदान देणाऱया विविध क्षेत्रातील नामवंत, प्रतिभावंत कलावंतही दिनांक
१९ नोव्‍हेंबर, २०१७ च्‍या कार्यक्रमास सायंकाळी ५.०० वाजता सादर करणाऱया कलाकारांना प्रोत्‍साहन मिळावे म्‍हणून उपस्थित राहणार आहेत. 

महाराष्‍ट्रीय तसेच भारतीय विविध कलागुणांना दर रविवारी खुले व्‍यासपीठ उपलब्‍ध व्‍हावे म्‍हणून बृहन्‍मुंबई महानगरपालिका व महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी संयुक्‍तपणे जहांगीर आर्ट गॅलरीसमोरील चौकात भव्‍य असे खुले व्‍यासपीठ अशा कलाकारांसाठी दर रविवारी उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे. सदर खुले व्‍यासपीठ हे मे २०१८ अखेरपर्यंत दर रविवारी सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० दरम्‍यान कलाकारांसाठी उपलब्‍ध असणार आहे.

या कार्यक्रमात उद्या दिनांक १५ नोव्‍हेंबर, २०१७ पर्यंत भाग घेण्‍यासाठी नोंदणी करण्‍यात येणार असल्‍याने कलाकारांनी महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळाच्‍या महाव्‍यवस्‍थापक स्‍वाती काळे (भ्रमणध्‍वनी
क्रमांक ८४२२८२२००३) व बृहन्‍मुंबई महानगरपालिका ‘ए’ विभागाचे सहाय्यक आयुक्‍त किरण दिघावकर (भ्रमणध्‍वनी क्रमांक ९९२०१८५२०१, कार्यालयाचा दूरध्‍वनी क्रमांकः ०२२२२६६७०३८, फॅक्‍सः ०२२२२६६०३९६), ‘ए’ विभागाचे तक्रार निवारण अधिकारी अमोल पाटील (भ्रमणध्‍वनी क्रमांक ९१६७४८०५३६), ‘ए’ विभागाचे कनिष्‍ठ अभियंता निलेश तोरसकर (भ्रमणध्‍वनी क्रमांक ९८१९३२३८५०) यांचेशी संपर्क साधून नोंदणी करुन घ्‍यावी, असेही संयुक्तिकपणे कळविण्‍यात आले आहे.

विविध क्षेत्रांतील कलाकारांना आपापल्‍या कला स्‍वयंस्‍फुर्तीने सादर करण्‍यासाठी मोफत व्‍यासपीठ उपलब्‍ध करुन देण्‍यात येईल. तरी कलाकारांनी जास्‍तीत-जास्‍त संख्‍येने आपापली नांवे नोंदवावीत, असे आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिका व महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी संयुक्‍तपणे केले आहे. तसेच मुंबईकर नागरिक आणि पर्यटकांनीही कलाकारांनी सादर केलेल्‍या विविध कलागुणांचा मनमुराद आनंद लुटावा नि कलाकारांना प्रोत्‍साहित करावे, असेही कळविण्‍यात आले आहे.

यासंबंधी अधिक माहिती http://m.facebook.com/mcskalaghoda/ या फेसबुक पेजवर संपर्क साधावा व जास्‍तीत-जास्‍त कलाकारांनी आपली नांवे नोंदवावी, असे आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिका व महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी संयुक्‍तपणे केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget