(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); नवीन वर्षात महापालिका क्षेत्रात बांधणार १८ हजार ८१८ शौचकूप ! | मराठी १ नंबर बातम्या
" />

नवीन वर्षात महापालिका क्षेत्रात बांधणार १८ हजार ८१८ शौचकूप !

मुंबई ( १५ नोव्हेंबर ) : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात अधिकाधिक शौचालये उपलब्ध व्हावेत, यादृष्टीने महापालिका सर्वस्तरीय प्रयत्न करीत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून येत्या नव्या वर्षात म्हणजेच सन २०१८ मध्ये महापालिका क्षेत्रात १८ हजार ८१८ शौचकुपांच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यास महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये अनेक एकमजली शौचालयांसह दुमजली व तीनमजली शौचालयांचे बांधकाम देखील करण्यात येणार असून याकरिता साधारणपणे ३७६ कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण करुन येत्या १५ जानेवारी २०१८ पर्यंत कार्यादेश (Work Order) देण्याचे आदेश प्रशासकीय प्रस्ताव मंजूर करताना महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. 

या शौचालय बांधकामांमध्ये नव्याने बांधण्यात येणा-या शौचालयांसोबतच धोकादायक परिस्थितीत असणारी शौचालये तोडून त्याठिकाणी पुनर्बांधकाम करण्यात येणा-या शौचालयांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे बांधकाम करताना नवीन व सुधारित आरेखनांचा (Design) वापर करण्यात येणार असल्याने जुन्या ११ हजार १७० शौचकुपांच्याच जागेत १५ हजार ७७४ शौचकुपांचे बांधकाम करण्यात येणार आहे. ज्यामुळे मुंबईकरांना जुन्या शौचालयांच्या जागेत अतिरिक्त ४ हजार ६०४ शौचकुपे उपलब्ध होणार आहेत. याव्यतिरिक्त ३ हजार ४४ शौचकुपे ही पूर्णपणे नव्याने बांधण्यात येणार आहेत.

महापालिकेद्वारे गेल्या सुमारे २० वर्षात बांधण्यात आलेली बहुतांश शौचालये ही एकमजली शौचालये आहेत. तथापि,बृहन्मुंबई महापालिका क्षेत्राची गरज लक्षात घेऊन आता शक्य त्याठिकाणी दुमजली व तीनमजली शौचालये बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच यामध्ये महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र मुतारी आणि लहान मुलांसाठी वेगळी व्यवस्था असणार आहे. त्याचबरोबर या शौचालयांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तळमजल्यावरच सुयोग्य व्यवस्था करण्यात येणार आहे.

वरील तपशीलानुसार शौचालयांच्या बांधकामाची कार्यवाही विभाग कार्यालयांद्वारेच केली जाणार आहे; मात्र याबाबतची निविदा प्रक्रिया उपप्रमुख अभियंता (वस्ती स्वच्छता कार्यक्रम) यांच्याद्वारे केली जाणार आहे. या शौचालयांचे बांधकाम करण्यासाठी शौचालयाच्या आकारानुसार सुमारे ९ महिने ते १२ महिने एवढा कालावधी अंदाजित आहे.

वरील तपशीलानुसार वर्ष २०१८ मध्ये महापालिकेद्वारे बांधण्यात येणा-या शौचकुपांची विभाग व परिमंडळ निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे:

परिमंडळ
विभाग
विभागातील शौचकुपांची प्रस्तावित संख्या
परिमंडळनिहाय शौचकुपांची संख्या
एक
184
477
डी
102
191
दोन
एफ /दक्षिण
500
1852
एफ /उत्तर
332
जी /दक्षिण
300
जी /उत्तर
720
तीन
एच /पूर्व
742
1302
के /पूर्व
560
चार
के /पश्चिम
154
2398
पी /दक्षिण
654
पी /उत्तर
1590
पाच
एल
2328
9930
एम /पूर्व
7200
एम /पश्चिम
402
सहा
एन
206
1240
एस
834
टी
200
सात
आर /दक्षिण
344
1619
आर /मध्य
419
आर /उत्तर
856

एकूण
18818
18818

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget