महापालिका आयुक्तांची मासिक आढावा बैठक संपन्न

मुंबई ( ३ नोव्हेंबर ) : महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनात महापालिका मुख्यालयातील आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात महापालिका अधिका-यांची मासिक आढावा बैठक आज दुपारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब ज-हाड, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार यांच्यासह महापालिकेचे सर्व संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते. आजच्या बैठकी दरम्यान चर्चिले गेलेले प्रमुख मुद्दे व संबंधित आदेश याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

कचरा व्यवस्थापनाबाबत

२० हजार चौ. मी. पेक्षा अधिक आकाराच्या भूखंडावरील गृहसंकुल, तसेच दररोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होतो अशा सोसायट्या वा उपहारगृहे इत्यादींनी त्यांच्या स्तरावर कच-याचे वर्गीकरण करणे तसेच ओल्या कच-यावर प्रक्रिया करुन त्यापासून खत निर्मिती करणे यापूर्वीच बंधनकारक करण्यात आले आहे.
याबाबत कार्यवाही करणे शक्य असूनही कचरा वर्गीकरण न करणा-या सोसायट्यांवर काय कारवाई करायची? तसेच ज्या सोसायट्यांनी मुदतवाढ मागितली आहे, त्यांच्या स्तरावर काय प्रगती झाली आहे, याचा आढावा घेणे इत्यादी बाबींवर सोमवार दि. ६ नोव्हेंबर २०१७ रोजी महापालिका आयुक्तांच्या स्तरावर विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये पुढील कारवाईची दिशा निश्चित करण्यात येईल.

ज्या इमारतींना २००७ नंतर 'आयओडी' देताना ज्या इमारतींना प्रदूषण नियंत्रण विषयक नियम / कायद्यानुसार कचरा वर्गीकरणाची अट टाकण्यात आली होती व ज्या सोसायटींद्वारे या अटीचे पालन योग्यप्रकारे केले जात नसेल, त्या सोसायट्यांच्या नावासह प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करण्यात येईल.

मॅनहोलबाबत

महापालिकेच्या अखत्यारितील मॅनहोलवरील कव्हर हे महापालिकेच्या संबंधित खात्यांद्वारे बसविण्यात येत असतात. यामध्ये प्रामुख्याने पर्जन्यजल वाहिन्या खाते, मलनिःसारण खाते, मलनिःसारण प्रचालने खाते, जल अभियंता खाते यासारख्या महापालिकेच्या विविध खात्यांचा समावेश होतो.

जे मॅनहोल उघडे असेल किंवा धोकादायक परिस्थितीत असेल अशा मॅनहोलबाबत संबंधित विभाग कार्यालयाद्वारे तातडीने आवश्यक ती सुरक्षेची उपाययोजना करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. यानुसार सुरक्षेची उपाययोजना केल्यानंतर सदर मॅनहोल महापालिकेच्या ज्या खात्याशी संबंधित असेल त्या
खात्याच्या मध्यवर्ती कार्यालयास विभाग कार्यालयाद्वारे तातडीने कळवायचे आहे.

वरीलनुसार संबंधित खात्याच्या वरळी अभियांत्रिकी संकुलात असणा-या मध्यवर्ती कार्यालयास उघड्या मॅनहोलबाबत माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांनी त्यापुढील ४८ तासांच्या आत सदर मॅनहोल बंद करण्याबाबत आवश्यक ती कार्यावाही करण्याचेही आदेश आजच्या बैठकी दरम्यान देण्यात आले आहेत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget