(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); उर्दू ही या देशाच्या मातीतील भाषा - विनोद तावडे | मराठी १ नंबर बातम्या
" />

उर्दू ही या देशाच्या मातीतील भाषा - विनोद तावडे

उर्दू साहित्य अकादमीचे सन २०१५ व २०१६ च्या पुरस्कारांचे वितरण

मुंबई ( १३ नोव्हेंबर ) : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात उर्दू भाषेतील ‘इन्कलाब जिंदाबाद’ या नाऱ्यानेच अनेक स्वातंत्र्य सैनिकांना देशासाठी प्राणाची आहुती देण्यास प्रेरित केले. त्यामुळे कुठल्यातरी देशाने उर्दूला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला म्हणून आपण उर्दूकडे पाठ फिरविण्याचं काहीच कारण नाही. उर्दू ही या देशाच्या मातीतील भाषा आहे. त्यामुळे उर्दू भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. भविष्यातही त्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले जाणार आहेत, असे अल्पसंख्याक विकास मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले.

उर्दू भाषेमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी मार्फत सन २०१५ व सन २०१६ वर्षाकरिता दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात श्री.तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री दिलीप कांबळे, उर्दू अकादमीचे अबू आझमी, अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

उर्दू अकादमीतर्फे दिले जाणारे हे पुरस्कार या भाषेतील सर्वोच्च पुरस्कार आहेत. त्यामुळे या पुरस्कारांचा उचित सन्मान होण्याच्या दृष्टीने पुढील वर्षीपासून हा पुरस्कार वितरण सोहळा राजभवनात घेण्यात यावा, असेही तावडे यांनी यावेळी सुचविले. आपल्या कारकिर्दीत सर्व प्रकारच्या शासकीय पुरस्कारांच्या निवडीत पारदर्शकता आणण्यासाठी आपण प्रयत्न केल्याचे देखील तावडेंनी सांगितले. महाराष्ट्रातील जनता ज्यावेळी उर्दूला मराठी आणि हिंदीप्रमाणे स्वीकारेल त्यावेळीच अल्पसंख्याक मंत्री म्हणून आपली कारकीर्द यशस्वी ठरेल, असेही तावडे यावेळी म्हणाले.

या समारंभात सन २०१५ करिता ५९ व सन २०१६ करिता ५७ अशा एकूण ११६ साहित्यिक/लेखक/कवी/पत्रकार/शिक्षक इ. प्रभृतींना महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी मार्फत पुरस्कार/स्मृतीचिन्ह/प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.


पारितोषिकाचे नाव

१. मिर्झा गालिब जीवन गौरव पुरस्कार - काझी अब्दुस सत्तार ( अलीगढ )
फुजैल जाफरी ( मुंबई )

२. वली दखनी राज्य पुरस्कार ( २०१५ करिता ) : काझी मुश्ताक अहमद ( पुणे )
वकील नजीब ( नागपूर )

3. नवोदित साहित्यक पुरस्कार ( २०१५ करिता ) : याहया जमील ( अमरावती )
असवद गौहर, ( औरंगाबाद )
फरहान हनिफ वारसी (मुंबई )
रशीद अशरफ ( मुंबई )

४. ले-आऊंट डिजाईनिंग पुरस्कार :
नाजीर नोमान सिघ्दीकी माहनामा शाईर (मुंबई)
इश्तीयाक अहमद, उर्दू सर्कल की दुनिया (मालेगांव)

५. उर्दू पत्रकारिता पुरस्कार

१. सय्यद मोहम्मद अब्बास, दै. उर्दू न्यूज, मुंबई

२. अन्सारी असगर जमील, संपादक,उर्दू मेला, नागपूर.

३. काझी मखदूम, दै. तामिर, बीड

४. मुर्शरफ शमसी, ठाणे सा. पहिली खबर, मीरा रोड ठाणे.

१. असीम जलाल, दै इन्किलाब मुंबई

२. रफीक अहमद मुश्ताक अहमद अन्सारी (खयाल असर मालेगांवी मालेगांव)

३. मुन्शी मोहम्मद ईकबाल सफदर अली, दै. हिन्दुस्तान मुंबई

४. मेराज अन्वर दै. राष्ट्रीय सहारा मुंबई.

६ विशेष पुरस्कार

१.डॉ. ए. आर. उन्द्रे, जि. रायगड

२. मोहम्मद अली पाटणकर, मुंबई

३. अस्लम फकीह, भिंवडी, ठाणे

४. सय्यद फोरोज अशरफ, मुंबई

५. अब्दुल्ला हसन चौधरी,अहमदनगर

६. मोहसीन अहमद बशीर अहमद,औरंगाबाद

७. अब्दुल रऊफ इमाम खान, नवी मुंबई

८. आय. जी. शेख, कोल्हापूर

९. राजेन्द्र जोशी, पुणे

१०. इंजिनियर हफीझ दुर्रानी जालना

१. मुजतबा फारूकी खुलताबाद

२. हारून रखानगी, मुंबई

३. नजिरूददीन, नागपूर

४. जमील गुलरेज, मुंबई

५. प्रकाश पाथरे, मुंबई

६. सबीहा बेगम खान, बीड

७. अब्दुल करीम अत्तार पुणे

८. अन्सारी मुशीर अहमद, मुंबई

९. अब्दुल वहीद, औरंगाबाद

१०. ईक्बाल नियाजी, मुंबई

७ शिक्षण सेवा पुरस्कार

(अ) विद्यापीठ पुरस्कार

डॉ कीर्ती मालिनी विठठलराव जावळे औरंगाबाद

(ब) प्राध्यापक पदवी महाविद्यालय पुरस्कार

१. डॉ. सरोशा काझी, जाकीर हुसैन कॉलेज, नागपूर

२. डॉ. मुसर्रत साहेब अली, मुंबईृ

३. डॉ. शर्फुनिहार, औरंगाबाद

१. डॉ. अकोला गौस, अंबाजोगाई, बीड

२. दानिश गणी, रत्नागिरी

३. शाहिदा मुनाफ, बुलढाणा

(क) स्कूल / ज्युनियर कॉलेज पुरस्कार

१. मोहम्मद दानिश मोहम्मद जियाऊलहक, यवतमाळ

२.डॉ. मोहम्मद खलील सिद्दीकी, लातूर

३. कलिम अहमद मोहम्मद युनूस,नागपूर

४. अबुल बारकात, भिवंडी,ठाणे

५. एजाज मंजूर आलम, सोलापूर

६. शमा तारापुरवाला, मुंबई

७. मोहम्मद ईमामुददीन हनीफुदीन,नांदेड

८.डॉ कलिम जिया, ठाणे

९. ईख्लाक अहमद शाह, जळगांव

१०. अजरा नसरीन अब्दुल हकीम खान, मुंबई

११. सय्यद जाहीद अली, ठाणे

१२. सफिया नसरूददीन अन्कोळवी, पुणे

१३.डॉ. गुलाम साबीर गुलाम मुस्तफा,अकोला

१४. इम्रान दाऊद कापडी, रत्नागिरी

१५. आयेशा मोहम्मद अमीन,मुंबई

1) सिद्दीकी मोहम्मद इरफान, बीड

2) सादीका बेगम अब्दुल सत्तार, गडचिरोली

3) शेख मोहम्मद शरफुद्दीन,औरंगाबाद

4) नसरीन असलम शेख, ठाणे

5) मोहम्मद शरफुद्दीन सौदागर,गडचिरोली

6) अमिन मोहिमतुले, मुंबई

7) आसिफ इक्बाल, सोलापूर

8) मोहम्मद ताहीर शाह, मुंबई

9) रशीदा अंन्जुम, नागपूर

10) डॉ.अब्दुल अजीज इरफान,औरंगाबाद

11) मोमीन सिराज अहमद एम सईद, रत्नागिरी

12) डॉ.अतीक अहमद तैय्यब शाह,अकोला

13) सायका समी मोहम्मद अकबर, यवतमाळ

14) फजीला अब्दुल मतीन,मुंबईृ

15) नसीरुद्दीन अन्सार, अकोला
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget