(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); ज्‍येष्‍ठ नागरिकच देशाची खरी संपत्‍ती – महापौर प्रिं. विश्‍वनाथ महाडेश्‍वर | मराठी १ नंबर बातम्या
" />

ज्‍येष्‍ठ नागरिकच देशाची खरी संपत्‍ती – महापौर प्रिं. विश्‍वनाथ महाडेश्‍वर

मुंबई ( ११ नोव्हेंबर ) : बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या विरंगुळा केंद्रात येणाऱया ज्‍येष्‍ठ नागरिकांच्‍या मार्गदर्शनातूच तरुण पिढीला भविष्‍याची दिशा मिळणार असल्‍याने ज्‍येष्‍ठ नागरिकच देशाची खरी संपत्‍ती असल्‍याचे प्रतिपादन मुंबईचे महापौर प्रिं. विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी केले.

जागतिक ज्‍येष्‍ठ नागरिक दिन सोहळा आणि ज्‍येष्‍ठ नागरिकांचा सत्‍कार समारंभ माटुंगा (प.) च्‍या यशवंत नाटय मंदिरात आज (दिनांक ११ नोव्‍हेंबर २०१७) आयोजित करण्‍यात आला होता, त्‍यावेळी ज्‍येष्‍ठ नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.

याप्रसंगी सार्वजनिक आरोग्‍य समिती अध्‍यक्षा रोहिणी कांबळे, महिला व बालकल्‍याण समिती अध्‍यक्षा सिंधू मसुरकर, माजी महापौर तथा नगरसेविका स्‍नेहल आंबेकर, नगरसेवक समाधान सरवणकर, नगरसेविका सर्वश्रीम. हर्षला मोरे, तेजिस्‍वि‍नी घोसाळकर, गिता सिंघण, राजराजेश्‍वरी रेडकर, मरियमा तेवर, ज्‍येष्‍ठ नागरिक संघाचे अध्‍यक्ष विजय औंधे, ‘ बी’ विभागाचे सहाय्यक आयुक्‍त उदयकुमार शिरुरकर, सहाय्यक आयुक्‍त ( नियोजन) डॉ.संगीता हसनाळे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महापौर प्रिं. विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्‍या हस्‍ते प्रारंभी वयाचे ९० वर्ष पूर्ण केलेल्‍या सखाराम पाताडे, एम.के. फटनाणी, विरप्‍पा काकनकी, एस.पी.गायकवाड, प्रमिला देशपांडे, सुनंदा बागकर, रामकृष्‍ण केणी, मधुकर कातकर, कमला वाटणकर, सरिता शहा, जैन नायगण या ज्‍येष्‍ठ नागरिकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्‍कार करण्‍यात आला.

महापौर प्रिं. विश्‍वनाथ महाडेश्‍वर यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, ज्‍येष्‍ठ नागरिकांचा सांस्‍कृतिक कार्यक्रम बघितल्‍यानंतर सादरकर्ते ज्‍येष्ठ न वाटता तरुण असल्‍याचे जाणवले. त्‍यामुळे आपण वयाने जरी मोठे असलात तरी मनाने तरुण राहले की वयाची जाणिव होत नाही, याचे मुर्तिमत उदाहरण म्‍हणजे आपला हा आजचा कार्यक्रम असल्‍याचे महापौरांनी सांगितले . ज्‍येष्‍ठ नागरिकांना ‘बेस्‍ट’ च्‍या बस भाडयामध्‍ये यापुढे ५० टक्‍के सुट देणार असल्‍याचे महापौरांनी यावेळी जाहिर केले. प्रत्‍येक मनुष्‍याने आपल्‍या आयुष्‍यात तारुण्‍य, संपत्‍ती, सौंदर्य, सत्‍ता याचा कधीही अहकांर न बाळगता आपण समाजव्‍यवस्‍थेचे एक घटक असून लोककल्‍याण हा आपला उद्देश असला पाहिजे, असेही महापौरांनी यावेळी सांगितले. प्रत्‍येक ज्‍येष्‍ठ नागरिकाला चांगले आरोग्‍य लाभो अश्‍या शुभेच्‍छा महापौरांनी शेवटी दिल्‍या.

महिला व बालकल्‍याण समिती अध्‍यक्षा सिंधू मसुरकर यांनी आपल्‍या मार्गदर्शनातून ज्‍येष्ठ नागरिकांनी तरुणालाही लाजवेल अश्‍याप्रकारचा दर्जेदार कार्यक्रम याठिकाणी सादर केल्‍याबद्दल ज्‍येष्‍ठ नागरिक संघाचे त्‍यांनी अभिनंदन केले.

ज्‍येष्‍ठ नागरिक संघाचे अध्‍यक्ष विजय औंधे यांनी आपल्‍या मार्गदर्शनातून प्रत्‍येक ज्‍येष्ठ नागरिकांनी एकटे न राहता ज्‍येष्‍ठ नागरिक संघाचे सदस्‍य होण्‍याचा सल्‍ला दिला, जेणेकरुन सर्वांच्‍या सहकार्य व प्रेमामुळे आपल्‍या आयुष्‍यात आनंद निर्माण होणे शक्‍य असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

सहाय्यक आयुक्‍त ( नियोजन) डॉ.संगीता हसनाळे यांनी आपल्‍या प्रास्‍ताविकातून ज्‍येष्ठ नागरिकांना देण्‍यात येणाऱया सोयीसुविधांचा आढावा घेतला. त्‍याचप्रमाणे आतापर्यंत बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने २३ विरंगुळा केंद्र उभारले असून २४ वे केंद्र हे आर/ दक्षि‍ण विभागात सुरु करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. त्‍याचप्रमाणे महापौरांच्‍या अध्‍यक्षतेखाली लवकरच ज्‍येष्‍ठ नागरिक संघाची स्‍थापना करण्‍यात येत असून वर्षातून संघाच्‍या दोन बैठका घेणार असल्‍याचे आश्‍वासन त्‍यांनी यावेळी उपस्‍थि‍तांना दिले. याप्रसंगी ज्‍येष्ठ नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget