(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); एसटी महामंडळ भरती 3 जिल्ह्यांचा निकाल लवकरच | मराठी १ नंबर बातम्या
" />

एसटी महामंडळ भरती 3 जिल्ह्यांचा निकाल लवकरच

मुंबई ( २८ नोव्हेंबर ) : राज्य परिवहन महामंडळाच्या चालक तथा वाहक (कनिष्ठ) पदाच्या सरळसेवा भरतीअंतर्गत कोकण विभागासाठी एकूण 7 हजार 929 पदांसाठी जाहिरात देण्यात आली हेाती. त्यापैकी मुंबई, सिंधुदूर्ग व रायगड विभागातून 900 उमेदवारांची निवड करण्यात आली असून पालघर, ठाणे व रत्नागिरी विभागाचा निकाल तयार करण्याचे काम सुरु आहे. हा निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.

यासंदर्भात विविध वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याबाबत एसटी महामंडळाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी खुलासा प्रसिद्ध केला आहे.

मुंबई विभागासाठी 1 हजार 29 पदांकरीता जाहिरात देण्यात आली होती, त्यासाठी 188 उमेदवार पात्र झाले आहेत. सिंधुदूर्ग विभाग769 पदांकरीता जाहिरात देण्यात आली होती, त्यासाठी 325 उमेदवार पात्र झाले आहेत. रायगड विभाग 1 हजार 117 पदांकरीता जाहिरात देण्यात आली होती, त्यासाठी 387 उमेदवार पात्र झाले आहेत. अशा प्रकारे या 3 विभागातून एकुण 900 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

तसेच, पालघर विभागाची लेखी परीक्षेचे व वाहन चालन चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांनुसार निकाल तयार करण्याचे काम सुरु असून लवकरच पालघर विभागाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, रत्नागिरी विभागाची वाहन चालन चाचणीचे कामकाज सुरु असून, त्यानंतर ठाणे विभागाची वाहन चालन चाचणी घेण्यात येणार आहे, या दोन्ही विभागातील वाहन चालन चाचणीचे कामकाज पूर्ण होताच मिळालेल्या गुणांनुसार निकाल जाहीर करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget