मुंबई ( १७ नोव्हेंबर ) : गेली २० वर्ष शैक्षणिक क्षेत्रात रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद कार्यरत आहे. विविध शैक्षणिक प्रश्नांवर आंदोलन करताना वेळप्रसंगी तुरुंगवास ही संघटनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी भोगलेला आहे. हाच ''२० वर्षांचा प्रवास'' सोहळा संघटनेच्यावतीने नव्या वर्षात ११ जानेवारी २०१८ रोजी प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आलेला आहे.
त्यानिमित्त महत्वाची बैठक खारघर येथील सेक्टर १२, प्लॉट नंबर सी १ / ए येथील संघटनेच्या द बुद्ध गार्डन या केंद्रीय कार्यालयात १० डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीसाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि मुंबई अध्यक्ष सचिन बनसोडे यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा