(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महापौर प्रिं. विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी नगरसेवकांना दिली क्षयरोग निर्मुलनाची शपथ | मराठी १ नंबर बातम्या
" />

महापौर प्रिं. विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी नगरसेवकांना दिली क्षयरोग निर्मुलनाची शपथ

मुंबई ( २४ नोव्हेंबर ) : बृहन्‍मुंबई महापालिकेच्‍या नगरसेवक/ नगरसेविका यांनी क्षयरोगाची तीव्रता समजावून घेऊन आपल्‍या प्रभागातील क्षयरोग निर्मुलनासाठी सक्रीय सहभाग घेतला तरच या मोहिमेला अधिक चांगले यश मिळणार असल्‍याने मुंबईचे महापौर प्रिं. विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी ‘आम्‍ही सर्वजण एकजुटीने क्षयरोगावर मात करण्‍यास कटिबध्‍द राहू’ या आशयाची शपथ महापालिका सभागृहातील सर्व नगरसेवकांना काल (दिनांक २३ नोव्‍हेंबर २०१७) दिली.

जागतिक आरोग्‍य संघटना आणि भारत सरकार यांनी सन २०३० पर्यंत देशातून क्षयरोग निर्मूलन करण्‍याचे उद्दि‍ष्ट जाहिर केले असून या पार्श्‍वभूमीवर काल सभागृहाचे कामकाज सुरु होताच महापौरांनी नगरसेवकांना क्षयरोगाचे उच्‍चाटन करण्‍यासाठी शपथ दिली. यामध्‍ये क्षयरोग मुक्‍त मुंबई व भारतासाठी मी प्रतिज्ञाबध्‍द आहे. क्षयरोग नियंत्रण व संपुष्‍टात आणण्‍यास मी (बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या कार्यक्रमात ) वचनबध्‍द आहे. मुंबईतील क्षयरोगाच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावाला आटोक्‍यात आणण्‍यासाठी माझ्या प्रभागात मी व माझे कार्यकर्ते क्षयरोग कार्यक्रमाअंतर्गत चाललेल्‍या उपक्रमात कार्यशील राहीन. क्षयरुग्‍ण आणि त्‍यांच्‍या कुंटुंबियांना मानसिक व सामाजिक पाठींबा मिळविण्‍याकरीता सर्वतो प्रयत्‍न करीन. समाजात असणारे क्षयरोग विषयी गैरसमज व समाजात क्षयरुग्‍णांशी होणारे भेदभाव दुर करण्‍यास सक्रीय राहीन. मी व माझे कार्यकर्ते क्षयरोगाविषयी जनजागृती कार्यक्रमांना उपस्थित राहून माझ्या प्रभागात जनजागृती करेन. माझ्या प्रभागातील औषधे चूकवणाऱया रुग्‍णांची अडचण समजावून त्‍यास औषधपचार पूर्ण करण्‍यास प्रोत्‍साहीत करीन. आम्‍ही सर्व एकजुटीने क्षयरोगावर मात करण्‍यास मुंबईकरांना प्रतिज्ञाबध्‍द होण्‍यास आवाहन करतो, अशी शपथ यावेळी नगरसेवकांनी घेतली. 
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget