प्लास्टिकचे ८ शेड्स देखील निष्कासित; वैशाली नगरमधील वाहतूक सुरळीत होण्यास मदत
जोगेश्वरी मध्ये पालिकेच्या 'के पश्चिम' विभागाची धडक कारवाई
मुंबई ( २३ नोव्हेंबर ) : महापालिकेच्या 'के पश्चिम' विभागात जोगेश्वरी पश्चिम मधील वैशाली नगर कपडा मार्केट परिसरातील रस्ते व पदपथांवर व्यवसायिक स्वरुपाची पक्की परंतु अनधिकृत बांधकामे / अतिक्रमणे उद्भवली होती. या अतिक्रमणांमुळे नागरिकांना पदपथांवरुन चालणे कठीण झाले होते. तसेच वाहतूक कोंडीत भर पडण्यासही ही अतिक्रमणे कारणीभूत ठरत होती. ही ५५ व्यवसायिक स्वरुपाची अनधिकृत बांधकामे / अतिक्रमणे महापालिकेद्वारे करण्यात आलेल्या धडक कारवाई दरम्यान तोडण्यात आली आहेत. तसेच प्लास्टिकचे ८ शेड्स देखील या कारवाई दरम्यान निष्कासित करण्यात आले आहेत. परिमंडळ – ४ चे उपायुक्त श्री. किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या धडक कारवाईमुळे वैशाली नगर परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यासह पादचा-यांना अवागमन करणे अधिक सुलभ होणार आहे, अशी माहिती के पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.
महापालिकेच्या के पश्चिम विभागाद्वारे जोगश्वरी पश्चिमेकडील वैशाली नगर मध्ये उद्भवलेली व्यवसायिक बांधकामे / अतिक्रमणे ही प्रामुख्याने कापड विक्रीशी संबंधित होती. ही पक्क्या स्वरुपातील अतिक्रमणे हटविण्यासाठी मुंबई पोलीस दलाचे विशेष सहकार्य महापालिकेला लाभले. साधारणपणे २० पोलीस कर्मचा-यांचा ताफा या कारवाईदरम्यान घटनास्थळी उपस्थित होता. या कार्यवाहीसाठी २ जेसीबी, ७ डंपर, २ पिंजरा गाड्या व इतर आवश्यक साधनसामुग्री वापरण्यात आली. या कारवाईत महापालिकेचे ३८ कामगार –
कर्मचारी - अधिकारी सहभागी झाले होते, अशीही माहिती सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा