विविध क्षेत्रांतील कलावंताचे कलागुण नागरिकांपर्यंत पोहचविण्‍यासाठी “खुले व्‍यासपीठ” हे महत्‍वपूर्ण माध्‍यम – आदित्‍य ठाकरे

मुंबई ( १९ नोव्हेंबर ) : विविध क्षेत्रातील कलावंताना आपली कला सादर करण्‍यासाठी जागा उपलब्‍ध होऊन त्‍यांचे कलागुण नागरिकांपर्यंत जाऊन पोहचावे या उद्देशाने ‘ खुले व्‍यासपीठ ’ हे महत्‍वपूर्ण माध्‍यम ठरणार असल्‍याचे प्रतिपादन युवा सेनाप्रमुख आदित्‍य ठाकरे यांनी प्रसारमाध्‍यम प्रतिनिधींशी संवाद साधताना केले.

महाराष्‍ट्रीय तसेच भारतीय विविध कलागुणांना दर रविवारी “खुले व्‍यासपीठ” उपलब्‍ध व्‍हावे म्‍हणून बृहन्‍मुंबई महानगरपालिका व महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने जहांगीर आर्ट गॅलरीसमोरील चौकात भव्‍य असे “खुले व्‍यासपीठ” कलाकारांसाठी मे २०१८ अखेरपर्यंत दर रविवारी अत्‍यल्‍प दरात उपलब्‍ध असणार असून याचा शुभारंभ आज (दिनांक १९ नोव्हेंबर, २०१७) करण्‍यात आला.

महाराष्‍ट्र राज्‍याचे मुख्‍य सचिव सुमित मलिक यांनी या ‘ खुले व्‍यासपीठ’ स भेट देऊन पाहणी केली तसेच नवोदित कलाकारांनी सादर केलेल्‍या विविध कलांचे कौतुक केले.

याप्रसंगी स्‍थानिक नगरसेविका सुजाता सानप, नगरसेवक अमेय घोले, अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त (शहर) ए.एल.जऱहाड, महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळाच्‍या महाव्‍यवस्‍थापक स्‍वाती काळे, ‘ऐ’ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर उपस्थित होते.

युवासेनाप्रमुख आदित्‍य ठाकरे प्रसारमाध्‍यम प्र‍तिनिधींशी संवाद साधताना पुढे म्‍हणाले की, रविवारी आपल्‍या कुटुंबि‍यासमवेत बाहेर पडणाऱया नागरिकांचे विविध कलागुणांच्‍या माध्‍यमातून निखळ मनोरंजन होऊन त्‍यांना आनंद प्राप्‍त व्‍हावा, या उद्देशानेही हा उपक्रम सुरु करण्‍यात आला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

सांस्‍कृतिक, कला, नाटय़, चित्रपट, संगीत, फॅशन, महाराष्‍ट्रीय तसेच भारतीय लोकनृत्‍यांचे विविध प्रकार मुंबईकर नागरिक व मुंबईला भेट देणाऱया देश-विदेशातील पर्यटकांना पाहता यावेत म्‍हणून सदर व्‍यासपीठ हे प्रथमच उपलब्‍ध करुन देण्‍यात आले आहे. या विविध क्षेत्रांतील कलाकारांनी आपापली कला या व्‍यासपीठावर सादर केली आहे. आज या शुभारंभाच्‍या दिन सुमारे १५ हजार मुंबईकरांनी भेट देऊन यास उत्‍सफूर्त प्रतिसाद दिला.

आज २१ कलावंतानी यामध्‍ये सहभाग घेतला.यामध्‍ये ‘बॉलिवुड’चे संतोष मिजगर यांनी ८ जागांची नोंदणी करुन त्‍यांनी बॉलिवूडवरील थिम साकारली. तसेच सुप्रसिध्द व्यंगचित्रकार विकास सबनीस यांनी व्यंगचित्रे साकारली. तर रुपाली मदन यांनी ‘स्केच आर्टिस्ट’ वर आपली कला सादर केली. तसेच उमेश राऊत ‘रोबोट्रीक्स’, सुनील जोनिया हे स्प्रे पेंटिग, धारावीतील कलांवत हे मातीची भांडी व पणत्या यांची प्रात्याक्षिके सादर केली; तसेच वारली पेंटिंगची कलाही काही कलाकारांनी यावेळी सादर केली. या खुले व्यासपीठात १५ बाय १५ चौरस फुट जागेत एक टेबल, २ खुर्च्यां तसेच एक बॅकड्राप पालिकेतर्फे रुपये दोनशे प्रत्‍येकी शुल्‍क आकारुन उपलब्ध करुन देण्यात आले होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget