(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); उदयकुमार शिरुरकर यांचे आवाहन " निरागस बाळाचे जीवन उमलण्यास हातभार तुमचाच " | मराठी १ नंबर बातम्या
" />

उदयकुमार शिरुरकर यांचे आवाहन " निरागस बाळाचे जीवन उमलण्यास हातभार तुमचाच "

मुंबई : अविवाहित माता आणि समस्याग्रस्त कुटुंबाच्या मुलांच्या भविष्याचे शिल्पकार व्हा, त्यांना असहाय्य करु नका, असे आवाहन बी वार्ड विभागाचे सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांनी केले.

अविवाहित माता आणि समस्याग्रस्त कुटुंब जन्मलेल्या लहान बाळाला रस्त्यावर सोडून देतात. अशावेळी त्या मुलाचे भवितव्य अंधकारमय होवू शकते. त्या मुलाची मानवी तस्करी होऊन मुलांचे शोषण ही होऊ शकते. त्यामुळे मुलांना रस्त्यावर सोडून न देता सुरक्षित भविष्यासाठी मुलांना योग्य संस्था मध्ये पोहचवा तसेच योग्य देखभाल करणाऱ्या संस्था ह्या मुलांना कायदेशिररीत्या दत्तक देऊ शकतात. यातून त्या मुलांना एक कुटुंब, प्रेम आणि संरक्षण मिळेल त्यांचे जीवन उमलेल. याकरीता आपण चाईल्ड लाईन (१०९८) किंवा पोलीस (१०३) अथवा इंडियन असोसिएशन फॉर प्रमोशन ऑफ अडॉप्शन अण्ड चाइल्ड वेलफेअर (२४३०७०७६) (९८२००८१७८८ ) यांच्याशी संपर्क करु शकता. तसेच रस्त्यावर असहाय्य लहान बाळ आढळल्यास संपर्क साधू शकता. असे आवाहन करण्यासाठी बी वार्ड विभागाचे सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांनी नुकताच आपल्या वॉर्डमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रम मध्ये इंडियन असोसिएशन फॉर प्रमोशन ऑफ अडॉप्शन अण्ड चाइल्ड वेलफेअर संस्थाचे कार्यकर्ते सहभगी झाले होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget