(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मुंबईत १२ जानेवारीपासून शॉपींग फेस्टिव्हल | मराठी १ नंबर बातम्या
" />

मुंबईत १२ जानेवारीपासून शॉपींग फेस्टिव्हल

मुंबई ( २२ नोव्हेंबर ) : मुंबईतील पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने येत्या १२ जानेवारी ते ३० जानेवारी २०१८ दरम्यान मुंबईत मुंबई शॉपींग फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सव काळात प्रस्तावित असलेल्या विविध उपक्रमांचे मंत्रालयात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सादरीकरण करण्यात आले. संबंधित विविध विभागांचे सहकार्य घेऊन या महोत्सवाचे दर्जेदार आयोजन करावे, अशा सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

देश-विदेशातील पर्यटकांचा मुंबईतील ओघ वाढविण्याच्या दृष्टीने हा शॉपींग फेस्टिव्हल महत्वाचा ठरेल. पर्यटन विभाग आणि एमटीडीसीने यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. राज्य शासनामार्फत या महोत्सवासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पर्यटनमंत्री जयकुमार रावल म्हणाले, मुंबईतील दुकानदार, शॉपींग मॉल्स, ज्वेलरी, चित्रपटगृहे, बॉलिवूड, हॉटेल, रेस्टॉरन्ट, पर्यटनविषयक कंपन्या आदी सर्वांचा सहभाग घेऊन या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. देश-विदेशातील पर्यटकांनी मुंबईत यावे, पर्यटनाचा आनंद घ्यावा, मनसोक्त शॉपींग करावी यादृष्टीने पर्यटन विभागामार्फत या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबईतील पर्यटनाला तसेच येथील अर्थव्यवस्थेला गती मिळावी यादृष्टीने हा महोत्सव महत्वाचा ठरेल, असे ते म्हणाले.

महोत्सवकाळात हॉटेलिंग, लॉजिंग, फूड, शॉपींग, ट्रॅव्हलिंग अशा विविध सेवांमध्ये सवलती देण्यास मुंबईतील संबंधीत विविध संस्था - संघटनांनी तयारी दर्शविली आहे. त्यांच्याशी पर्यटन विभाग समन्वय साधत असून यामुळे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करता येईल. दुबई फेस्टिव्हलच्या धर्तीवर संपूर्ण एमएमआर परिसरात मुंबई शॉपींग महोत्सवाचे दर्जेदार आयोजन करु. हा फक्त शॉपींग फेस्टिव्हल नसेल. या काळात पर्यटकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, उपक्रमांचेही आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्रालयात आयोजित या बैठकीस पर्यटन मंत्री जयकुमार रावल, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ए. एल. जऱ्हाड, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सह व्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget