महात्मा फुले विकास महामंडळामार्फत विविध व्यवसाय प्रशिक्षणाचे आयोजन

मुंबई ( २३ नोव्हेंबर ) : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, अंतर्गत अनुसूचित जातीतील उमेदवारांकरिता सन 2017-18 या आर्थिक वर्षाच्या विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजनेअंतर्गत विविध व्यवसायाचे तीन महिने कालावधीचे विनामुल्य प्रशिक्षण दि. 1 डिसेंबर 2017 पासून सुरु करण्यात येणार आहे.

प्रशिक्षण व्यवसायाची नावे पुढीलप्रमाणे :- संगणक प्रशिक्षण, ब्युटी पार्लर, फॅशन डिझायनिंग, मोबाईल रिपेरिंग, ऑटोमोबाईल रिपेरिंग-(2, 3, 4 चाकी), मोबाईल रिपेरिंग सर्व्हिस सेंटर, टी.व्ही./रेडिओ/ टेप रेकॉर्डर मशीन, फॅब्रीकेटर/बेल्डींग वर्क्स, वाहन चालक, रेफ्रिग्रेशन/ए.सी.रिपेरिंग, मोटर रिवाइडिंग, पेंटिंग (ऑटोमोबाईल्स).

प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी त्वरित महामंडळाच्या जिल्हा कार्यालय, गृहनिर्माण भवन, तळ मजला, रुम नं.35, कलानगर, वांद्रे (पूर्व) मुंबई, दूरध्वनी क्र.26592640, 26599895 येथे संपर्क साधावा, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget