(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रमाणित लेखापरीक्षकांना 20 टक्के लेखापरीक्षण शुल्क परत मिळणार | मराठी १ नंबर बातम्या
" />

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रमाणित लेखापरीक्षकांना 20 टक्के लेखापरीक्षण शुल्क परत मिळणार

मुंबई ( ३० नोव्हेंबर ) : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वैधानिक लेखापरीक्षणाअंती शासनाकडे भरणा केलेले 20 टक्के लेखापरीक्षण शुल्क संबंधित सनदी/ प्रमाणित लेखापरीक्षकांना परत मिळणार आहे. याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हील ॲप्लीकेशन क्र. 84/2013 बाबत दि. 13 जुलै 2017 रोजी दिलेला आहे.

तरी मुंबई जिल्ह्यातील संबंधित सनदी/प्रमाणित लेखापरीक्षक यांनी सहकारी दूध संघ/संस्थांचे 20 टक्के लेखापरीक्षण शुल्क शासनाकडे भरणा केलेल्या चलनाच्या प्रती व संस्थांची यादी तात्काळ विशेष लेखापरीक्षक वर्ग-1, सहकारी संस्था(दुग्ध), प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, अब्दुल गफार खान रोड, वरळी सीफेस, मुंबई-400018 या कार्यालयास सादर करण्याचे आवाहन मुंबई विशेष लेखापरीक्षक वर्ग-1, सहकारी संस्था(दुग्ध) कृष्णा खिलारी यांनी केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget