(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); अकृषी विद्यापीठांच्या बृहत आराखड्यांना मंजुरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मराठी १ नंबर बातम्या
" />

अकृषी विद्यापीठांच्या बृहत आराखड्यांना मंजुरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई ( २१ नोव्हेंबर ) : मुंबई वगळता राज्यातील अकृषी विद्यापीठांनी सादर केलेल्या बृहत आराखड्यांच्या अभ्यासासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्ती करण्यात आली होती. या तज्ज्ञ समितीने दिलेल्या अहवालानुसार पाच विदयापीठाच्या बृहत आराखड्यांना अंतिम मंजुरी देण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची आढावा बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार दर पाच वर्षाने तयार केलेल्या बृहत आराखड्यांना महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची परवानगी घेणे आवश्यक असते. त्यानुसार राज्यातील अकृषी विद्यापीठातील बृहत आराखडे यांना मंजुरी देणे यासाठी सदर बैठक आयोजित करण्यात आली होती. सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, मुंबई विद्यापीठ, मुंबई, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, या विद्यापीठांनी मांडलेल्या बृहत आराखड्यांमध्ये नवीन महाविद्यालय, परिसंस्था, अभ्यासक्रम, विद्याशाखा, विषय यांचा समावेश आहे. या बृहत आराखड्यांची जाहिरात करण्यासही आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आणि विकास आयोग (माहेड) संदर्भातील बैठक आज मंत्रालयातील परिषद सभागृहात आयोजित करण्यात आली होती. बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, उच्च व तंत्र शिक्षण राज्य मंत्री रवींद्र वायकर, उच्च्र व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव मीता राजीव लोचन, नियोजन विभागाचे प्रधान सचिव आर. श्रीनिवासन, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसचिव सिध्दार्थ खरात, शिक्षण संचालक माने आदी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget