मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना सवलत - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई ( २३ नोव्हेंबर ) : राज्यातील शेतकऱ्यांसाठी केवळ ३ व ५ हजार रुपये भरून मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होण्याची सवलत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे जाहीर केली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी असलेल्या या योजनेचा लाभ दि. ३० नोव्हेंबर २०१७ लाभ घ्यावा, असे आवाहनही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी केले आहे.

या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांची ३० हजारापेक्षा कमी थकबाकी असल्यास सुरुवातीला केवळ ३ हजार व ३० हजारापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना ५ हजार रुपये भरून दि. ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेता येईल. तसेच ज्या शेतकऱ्यांना वीज देयकाची दुरुस्ती करावयाची आहे, त्यांच्यासाठी प्रत्येक फिडरनिहाय वीजदेयक दुरुस्ती शिबीराचे आयोजन दि. १ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०१७ या कालावधीत महावितरणतर्फे करण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

कृषीपंपांना थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७ ची घोषणा दि. ३० ऑक्टोबर २०१७ ला करण्यात आली होती. या योजनेची मुदत ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत असून या योजनेत सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होऊन महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन ऊर्जामंत्र्यांनी केले आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा वीजबिलांचा भरणा न केल्यामुळे खंडित करण्यात आलेला आहे. अशा शेतकऱ्यांनी पैसे भरताच त्यांचा वीजपुरवठा तात्काळ जोडावा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

मुंबईत महावितरणचे मुख्यालय प्रकाशगड येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत ऊर्जा सचिव अरविंद सिंह, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार व महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे आदी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget