(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); कौमी एकता सप्ताहात निधी संकलनासाठी 25 नोव्हेंबर ध्वजदिन म्हणून साजरा होणार | मराठी १ नंबर बातम्या
" />

कौमी एकता सप्ताहात निधी संकलनासाठी 25 नोव्हेंबर ध्वजदिन म्हणून साजरा होणार

मुंबई ( १८ नोव्हेंबर ) : कौमी एकता सप्ताहामध्ये सांप्रदायिक सदभावना मोहिम निधी संकलन सप्ताह साजरा करण्यात येणार आहे तर 25 नोव्हेंबर हा दिवस ध्वजदिन साजरा करण्यात येईल.

25 नोव्हेंबर रोजी सर्व शासकीय कार्यालये, विद्यालये, महाविद्यालये, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे, सार्वजनिक संस्था आणि देणगीदार यांच्याकडून स्वच्छेने निधी संकलित करण्यात येणार आहे.खाजगी संस्था, देणगीदार अथवा करदाते यांना ध्वजदिनानिमित्ताने धनादेश स्वरुपातही मदत देता येईल. सदर धनादेश सचिव, राष्ट्रीय सांप्रदायिक सदभावना प्रतिष्ठान, नवी दिल्ली यांच्या नावाने देण्यात यावा. याबरोबीच निधी संकलनासाठी आवश्यक असलेले डबे माजी सैनिक कल्याण मंडळे, रेड क्रॉस सोसायटी, तत्सम संघटना यांच्याकडून मिळणार आहेत.

डब्यात संकलित केलेला निधी कार्यालयातील जबाबदार अधिकाऱ्यासमोर मोजून त्याचा डिमांड ड्राफट तयार करुन तो आणि इतर संस्था, देणगीदार यांच्याकडून आलेला धनादेश सचिव, राष्ट्रीय सांप्रदायिक सदभावना प्रतिष्ठान, सी विंग, 9 वा मजला, लोकनायक भवन, खान मार्केट, नवी दिल्ली येथे नोंदणी टपालादवारे
पाठविण्यात यावा.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget