(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); प्रीमियम थकवणा-या विकसकांवर महापालिकेची कारवाई | मराठी १ नंबर बातम्या
" />

प्रीमियम थकवणा-या विकसकांवर महापालिकेची कारवाई

१८ प्रकरणी विकसकांवर बजावली 'स्टॉप वर्क नोटीस'

३५७ कोटी व व्याज वसूल करण्यासाठी महापालिकेने सुरु केली कारवाई

मुंबई ( २३ नोव्हेंबर ) : विकास नियंत्रण नियमावली अधिनियम ३३(७) अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या १८ प्रकल्पांबाबत संबंधित विकसकाद्वारे इमारतीचे बांधकाम अपेक्षित कालावधीत पूर्ण करण्यात न आल्याने; तसेच महापालिकेकडे अपेक्षित प्रीमियम रक्कम देखील न भरल्याने महापालिकेने १८ विकसकांवर 'स्टॉप वर्क नोटीस' बजावली आहे. या १८ विकसकांकडून महापालिकेला रुपये ३५७.८४ कोटी एवढी रक्कम व दर साल दर शेकडा १८ टक्के याप्रमाणे विलंबित कालावधीचे व्याज देय आहे. सदर विकसकांकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने त्यांच्यावर संबंधित कायदा व नियमान्वये कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार १८ प्रकरणी संबंधित विकसकांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे व'स्टॉप वर्क नोटीस' बजावण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या मालमत्ता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

महापालिकेच्या भूखंडांवर असणा-या इमारतींचा पुनर्विकास करताना त्याबाबत विकसकाने महापालिकेकडे प्रीमियम रक्कम भरणे बंधनकारक आहे. प्रीमियम रकमेची गणना ही भांडवली मूल्य आधारित प्रणालीनुसार करण्यात येते. यानुसार जी रक्कम येईल त्याबाबत पूर्वीच्या पद्धतीनुसार १० टक्के रक्कम करारावेळी; तर उर्वरित ९० टक्के रक्कम बांधकाम पूर्णत्वाच्या वेळी जमा करणे बंधनकारक आहे. तथापि, दि. ५ मे २०१२ पासून या पद्धतीत काही सुधारणा करण्यात आल्या आहेत.यानुसार प्रकल्प कराराच्या वेळी २० टक्के रक्कम, पात्रता धारकांसाठीची इमारत बांधकाम पूर्ण झाल्यावर व विक्री योग्य इमारतीच्या बांधकामाची सुरुवात करताना ६० टक्के; तर उर्वरित २० टक्के रक्कम विक्री योग्य इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र (O.C.) प्राप्त करताना जमा करणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर सदर प्रकल्प निर्धारित कालावधी दरम्यान पूर्ण करणेही विकसकाला बंधनकारक असते.

मात्र जे विकसक निर्धारित कालावधी दरम्यान प्रकल्प पूर्ण करित नाहीत, तसेच महापालिकेकडे प्रीमियम रक्कम जमा करित नाहीत; त्यांच्यावर संबंधित नियमांनुसार कारवाई करण्यात येते. यामध्ये प्रामुख्याने विलंब कालावधीसाठी दर साल दर शेकडा १८ टक्क्यांप्रमाणे दंडात्मक व्याज आकारणी करण्यात येते. मात्र तरीही विकसकाने प्रकल्प पूर्ण न केल्यास सदर प्रकरणी 'स्टॉप वर्क नोटीस' दिली जाते. त्यानंतर संबंधित विकसकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात येते. त्यांची बाजू योग्य वाटल्यास प्रकल्पाच्या कालावधीत वाढ केली जाते. मात्र, विकसकांनी मांडलेली कारणे समाधानकारक नसल्यास प्रकल्प रद्द करुन नव्याने निविदा काढण्याची कारवाई देखील केली जाते.

वरीलनुसार महापालिका क्षेत्रातील १८ पुनर्विकास प्रकल्प प्रकरणी प्रकल्प पूर्ण न करणा-या, तसेच संबंधित करारानुसार महापालिकेकडे प्रीमियम पोटी रुपये ३५७ कोटी ८४ लाख ६१ हजार ०४ एवढी रक्कम जमा न करणा-या; संबंधित विकसकांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारत सदर प्रकल्पांना काम थांबविण्याच्या नोटीसा (Stop Work Notice) देण्यात आल्या आहेत. तसेच या प्रकरणांमध्ये शेवटची संधी म्हणून विकसकांकडून लेखी स्वरुपात अंतिम स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.

या १८ पुनर्विकास प्रकल्पांबाबतचा संक्षिप्त तपशील खालीलप्रमाणे आहेः

.क्र.
विभाग
प्रस्तावित सोसायटीचे नाव
विकसकाचे नाव
प्रकल्प पूर्ण करावयाची अंतिम तारीख
प्रीमियम पोटी येणे रक्कम
(देय रक्कम)
1
माझगाव सहगृहसंस्था
मेशंकला रिएल्टर्स प्रा.लि.
26.06.2009
82124082
2
आशिर्वाद सहगृहसंस्था
मेएक्सलंट रिएल्टर्स प्रा.लि.
08.04.2011
50996565
3
अब्रार सहगृहसंस्था
मेबीएमके एंटरप्रायजेस
27.05.2010
51374540
4
गुलमोहर सहगृहसंस्था
मेअबू एंटरप्रायजेस
26.03.2010
2968730
5
न्यू ढोलकवाला सहगृह.संस्था
मेबुखारी डेव्हलपर्स प्रा.लि.
08.08.2012
15538011
6
पारिजात सहगृहसंस्था
मेओम शांती प्रॉपर्टीज
09.04.2014
221480392
7
माझगाव ढोलकवाला सह.गृहसंस्था
मेवर्धमान डेव्हलपर्स लि.
16.04.2017
410648847
8
एफ /दक्षिण
मयूर सहगृहसंस्था
मेप्राईम डेव्हलपर्स
13.06.2013
215545617
9
एफ /दक्षिण
गणेश लीला सहगृहसंस्था
मेप्रार्थना एंटरप्रायजेस
20.06.2006
31134442
10
एफ /दक्षिण
जय गावदेवी सहगृह.संस्था
मेओम शांती गृहनिर्माण डेव्हलपर्स
24.08.2013
25123385
11
एफ /दक्षिण
धरती सहगृहसंस्था
मेओम शांती हाऊसिंग
29.06.2009
111105432
12
एफ /दक्षिण
महापुरूष दादाभाई सहगृह.संस्था
मेओम शाबि डेव्हलपर्स
02.08.2012
40513990
13
एफ /उत्तर
श्रीआजाद नगर भडूत सह.गृहसंस्था
मेइस्ट वेस्ट बिल्डर्स
29.03.2010
217504674
14
जी /दक्षिण
शारदा सहकारी गृहसंस्था
मेओम शांती बिल्डकॉन
04.10.2015
54053305
15
जी /दक्षिण
१४१ टेनामेंट भाडेकरु सहकारी गृहसंस्था
मेयश एंटरप्रायजेस
22.04.2015
403032200
16
जी /दक्षिण
संकल्प सिद्धी सहकारी गृह.संस्था
मेइस्टेट प्रा.लि.
22.08.2015
145047780
17
जी /दक्षिण
श्रीशांतीनगर सहकारी गृह.संस्था
मेश्रीशांतीनगर व्हेंचर
31.08.2013
1201081708
18
जी /दक्षिण
मंगल भुवन सहकारी गृह.संस्था
मेऍपेक्स डेव्हलपर्स
28.04.2012
299187304
एकूण
3578461004
***
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget