हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारकास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री दिपक केसरकर, मुंबईचे महापौर प्रिं.विश्वनाथ महाडेश्वर, स्थानिक खासदार अरविंद सावंत, महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव सुमित मलिक, महापालिका आयुक्त अजोय मेहता, मुंबई पोलिस आयुक्त दत्तात्रय पडसलगिकर, स्थानिक नगरसेविका सुजाता सानप, ‘ए’ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर व इतर मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.
दिनांक २१ नोव्हेंबर, १९५५ या दिवशी फ्लोरा फाऊंटन म्हणजेच आताच्या ``हुतात्मा चौक’’ येथे प्रथम चौदा जण हुतात्मे झाले, म्हणून २१ नोव्हेंबर महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान केलेल्या क्रांतिकारकांचा पुण्यस्मरणाचा दिवस म्हणून `हुतात्मा दिन’ म्हणून पाळण्यात येतो.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी जनतेने १६ ते २० जानेवारी, १९५६ आणि ०३ जून, १९५६ पर्यंत दिलेल्या लढय़ात १०६ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.
टिप्पणी पोस्ट करा