मुंबई ( १५ नोव्हेंबर ) : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्त्यांवरील खड्डे आणि दुरावस्थेबाबतच्या तक्रारीसंदर्भात नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई विभागासाठी सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, 105, पी.डब्ल्यू.डी. इमारत, उच्च न्यायालय, फोर्ट, मुंबई, दूरध्वनी क्र. – 22691395, 22691358, 22665866, ई-मेल – mslsa_bhc@nic.in यांची तसेच मुंबई वगळता अन्य जिल्ह्यांसाठी सचिव, संबंधित जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
रस्त्यांवरील खड्डे आणि रस्त्यांची दुरावस्था पाहता मा. उच्च न्यायालयाने सर्व सामान्य जनतेच्या तक्रारीसंदर्भात दाद मिळावी याकरिता हा कक्ष निर्माण केला आहे. मुंबई महापालिकेअंतर्गत असणाऱ्या रस्त्यांबाबतच्या तक्रारी असल्यास त्या ई-मेल/पोस्टाद्वारे/प्रत्यक्षात नियुक्त नोडल अधिकाऱ्यांकडे व संबंधित महापालिकेकडे सुद्धा दाखल कराव्यात.

टिप्पणी पोस्ट करा