मुंबई ( २१ नोव्हेंबर ) : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाचव्या वेतन आयोगानुसार वेतनाची थकीत रक्कम देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या एकूण 397 अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळून, 1 जानेवारी 1996 ते 31 मार्च 2004 या कालावधीतील पाचव्या वेतन आयोगाच्या लाभाची 3 कोटी 13 लाख 44 हजार 047 रुपये इतकी थकीत रक्कम देण्यात येणार आहे. या थकबाकीसंदर्भात मंडळातील अधिकारी संघटना व इतर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर 17 एप्रिल 2017 रोजी झालेल्या सुनावणीमध्ये, थकबाकीची रक्कम देण्याबाबत विचार करावा, असे अंतरिम आदेश न्यायालयाने दिले होते. त्याअनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा