(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); "सिंघम" उदयकुमार शिरुरकर यांनी कंत्राटदारांविरोधात काढल्या २४ नोटिस | मराठी १ नंबर बातम्या
" />

"सिंघम" उदयकुमार शिरुरकर यांनी कंत्राटदारांविरोधात काढल्या २४ नोटिस

मुंबई ( १४ नोव्हेंबर ) : अनधिकृत बांधकाम आणि फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासोबत विभागातील नागरिक सुविधांकडे विशेष लक्ष देणारे पालिकेच्या बी वार्डचे सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर उर्फ ''सिंघम'' यांनी आता आपला मोर्चा पदपथावर डेब्रिज टाकणाऱ्या कंत्राटदारांकडे वळविला आहे. त्यांनी थेट कंत्राटदारांना पदपथावर डेब्रिज टाकल्याकारणाने नोटीस पाठवत त्यांचे इमारतीचे बांधकाम बंद करण्याची ताकीद ही दिली आहे. शिरुरकर यांनी मंगळवारी (१४ नोव्हेंबर ) कंत्राटदारांना २४ नोटिस धाडल्या आहेत.

बी वार्ड मध्ये म्हाडा तर्फे इमारतींचे बांधकाम सुरु असून कंत्राटदार बिनधास्तपणे पदपथावर डेब्रिज टाकत आहे. हेच डेब्रिज उचलण्याचे काम महापालिकेला करावे लागत असून याविरोधात सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांनी कंत्राटदारांना नोटिस पाठविल्या आहेत.

याबाबत सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांनी सांगितले की, प्रत्यक्षात डेब्रिजची विलेव्हाट लावण्याचे काम हे कंत्राटदाराचे असते. तरीही म्हाडा केवळ कंत्राटदारांना डेब्रिज उचलण्यास सांगून डेब्रिजची विल्हेवाट कशी लावणार, हे त्यांच्याकडून काहीच जाणून घेत नाही. त्यामुळे हे कंत्राटदार डेब्रिजची विल्हेवाट न लावता रस्त्यावर डेब्रिज टाकून देतात. याबाबत म्हाडा प्राशनाला कळविण्यात आले आहे.

कंत्राटदार डेब्रिजची विल्हेवाट कशी लावणार, याबाबत त्यांनी पालिकेच्या उपायुक्त यांच्यासोबत बी वार्डच्या सहाय्यक आयुक्त यांना ही कळवावे, असा उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आला आहे. पदपथावर डेब्रिज टाकले तर काम बंद करण्यात येईल, अशी ताकीद ही नोटिस मध्ये कंत्राटदारांना देण्यात आलेली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget