(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शि‍वाजी पार्क लगतच्‍या मैदांनामध्‍येही अनुयायांसाठी निवाऱयाची सुविधा पुरवाव्यात – महापौर | मराठी १ नंबर बातम्या
" />

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शि‍वाजी पार्क लगतच्‍या मैदांनामध्‍येही अनुयायांसाठी निवाऱयाची सुविधा पुरवाव्यात – महापौर

मुंबई ( २० नोव्हेंबर ) :महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिनांक ६ डिसेंबर, २०१७ रोजी ६१ व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त देशभरातील लाखो अनुयायी बाबासाहेबांना नतमस्‍तक होण्‍यासाठी चैत्‍यभूमी येथे येत असून वाढती संख्‍या लक्षात घेता शिवाजी पार्क व्‍य‍तिरिक्‍त लगत असलेल्‍या मैदांनामध्‍येही अनुयायासाठी निवाऱयांची सुविधा पुरविणे आवश्‍यक असून त्‍यासाठी अर्थसंकल्‍पात विशेष तरतूद करावी अशी सूचना महापौर प्रिं. विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी केली.

चैत्यभूमी स्मारक (दादर पश्चिम) येथे पुरविण्यात येणाऱया विविध नागरी सेवा - सुविधांबाबत मुंबईचे महापौर प्रिं. विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी आज (दिनांक २० नोव्हेंबर, २०१७) महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात पालिकेतील पदाधिकारी, अधिकारी, पोलिस अधिकारी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी यांची संयुक्त बैठक आयोजित केली, त्यावेळी ते बोलत होते.

महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर देश-विदेशातून येणाऱया लाखों अनुयायांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे चैत्यभूमी तसेच शिवाजी पार्क परिसरांत दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध नागरी सेवा - सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

महापौर प्रिं. विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उप महापौर हेमांगी वरळीकर, सभागृह नेता यशवंत जाधव, स्‍थायी समिती अध्‍यक्ष रमेश कोरगांवकर, सुधार समिती अध्‍यक्ष अनंत नर, शि‍क्षण समिती अध्‍यक्षा शुभदा गुढेकर, बेस्‍ट समिती अध्‍यक्ष अनिल कोकीळ, सार्वजनिक आरोग्‍य समिती अध्‍यक्षा रोहिणी कांबळे, माजी महापौर तथा नगरसेविका स्‍नेहल आंबेकर, नगरसेविका सुजाता सानप, समिता कांबळे, संगीता हंडोरे, अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त (शहर) ए.एल.जऱहाड, उप आयुक्त (परिमंडळ - २) नरेंद्र बरडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. अविनाश सुपे, शिक्षणाधिकारी महेश पालकर, जी/उत्‍तर विभागाचे सहाय्यक आयुक्‍त रमाकांत बिरादर तसेच संबंधित वरिष्ठ पोलिस अधिकारी, संबंधित विविध अधिकारी आणि भन्तेजी, संबंधित विविध संघटनांचे पदाधिकारी, सदस्य हे मान्यवर उपस्थित होते.

महापरिनिर्वाण दिनासाठी देश-विदेशातून येणाऱया अनुयायांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे चैत्यभूमी तसेच शिवाजी पार्क परिसरात विविध सेवा-सुविधा पुरविण्यात येणार आहेत. ‘जी/उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार यांनी बैठकीदरम्यान महापालिका प्रशासनाच्यावतीने पुरविण्यात येणार असलेल्या सेवा-सुविधांचे व नियोजनाचे संगणकीय सादरीकरण केले. याबाबत सर्व उपस्थितांनी महापालिका प्रशासनाचे कौतुक करीत प्रशासनाने मागील दोन वर्षांपासून उत्तमोत्तम पुरविलेल्या सेवा-सुविधांबाबतही कौतुक केले.

महापौर प्रिं. विश्‍वनाथ महाडेश्‍वर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक स्तरावरील कार्य व लौकिक पाहता त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जनसंपर्क विभागाच्‍या वतीने प्र‍काशित करण्‍यात येणाऱया माहितीपुस्‍तिकेमध्‍ये वेगवेगळया विषयावरील लेख प्रसिध्‍द करावे, जेणेकरुन संपूर्ण विश्‍वात त्‍यांचे कार्य पोहचेल. बैठकीला उपस्थित नागरिकांनी केलेल्या सुचनांचे महापौरांनी स्‍वागत करुन महापालिका प्रशासनाने या सूचनांची शहानिशा करुन त्या अंमलात आणण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी,अशी सूचनाही महापौरांनी यावेळी केली. त्‍यासोबतच सर्वपक्षीय नगरसेवकांना सोबत घेऊन महापौरांच्‍या अध्‍यक्षतेखाली व सामाजिक संघटनांच्‍या सहभागातून नव्‍याने महापरिनिर्वाण दिन समन्‍वय समिती गठीत करण्‍यात येणार असल्‍याचे, त्‍यांनी यावेळी सांगितले.

सभागृह नेते यशवंत जाधव यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६१ वा महापरिनिर्वाण दिन योग्यरित्या पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाने अनेकवेळा बैठका घेऊन योग्य पद्धतीने नियोजन केले आहे. ६१ व्या महापरिनिर्वाण दिनी येणाऱया लाखो अनुयायांसाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे. यादृष्टीने आवश्यक ती साधनसामुग्री व पुरेशा कर्मचाऱयांचीही व्यवस्था केली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. त्‍याचप्रमाणे जी/उत्तर विभागातर्फे वितरीत करण्‍यात येणाऱया स्‍टॉलमध्‍ये कंत्राटदारांकडून अतिरिक्‍त शुल्‍क आकारण्‍यात येत असून ते शुल्‍क आकारु नये अशी सूचना त्‍यांनी प्रशासनाला केली. त्‍याचप्रमाणे हे स्‍टॉल ७ डिसेंबरपर्यंत कायम ठेवावे, अशी सूचनाही त्‍यांनी केली. त्‍याचप्रमाणे वरळीच्‍या जांभोरी मैदानात किंवा आंबेडकर मैदानात अनुयायांसाठी अतिरिक्‍त निवासाची व्‍यवस्‍था करण्‍याची सूचना त्‍यांनी यावेळी केली. तसेच दादर स्‍थानकापासून वरळी स्‍माशनभूमीतील माता रमाई स्‍मृतीस्‍थळ व राजगृहापर्यंत बेस्‍ट बसची सुविधा उपलब्‍ध करण्‍याची सूचना करुन बसस्‍टॉपवरील फलकातून आकारण्‍यात येणाऱया टॅक्‍समधून सुट देण्‍याचेही त्‍यांनी यावेळी मागणी केली. त्‍याचप्रमाणे महापरिनिर्वाण दिनासाठी स्‍वतंत्र बजेट हेड ओपन करुन पुढच्‍यावर्षीपासून यासाठी रुपये ५ कोटीची तरतूद करण्‍याची सूचना त्‍यांनी शेवटी केली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget