आज ‘विद्यार्थी दिन’

मुंबई ( ७ नोव्हेंबर ) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 7 नोव्हेंबर 1900 रोजी प्रतापसिंह हायस्कूल, राजवाडा चौक, जि. सातारा या शाळेत प्रवेश झाला. हा दिवस ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळाप्रवेश दिन म्हणजे एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीचे पाऊल ठरले. शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर परिश्रमांची जाण सर्व विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने 7 नोव्हेंबर हा दिवस ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

विद्यार्थी दिवसाचा मुख्य शासकीय कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतलेले प्रतापसिंह हायस्कूल, जि. सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘विद्यार्थी दिवस’ या उपक्रमांतर्गत सर्व शाळांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्य वाचन इ. उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget