(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मंत्रिमंडळ निर्णय - 28 नोव्हेंबर 2017 - माहिती तंत्रज्ञान विषयक सर्व बाबींची खरेदी आता गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस वेबपोर्टलमार्फत | मराठी १ नंबर बातम्या
" />

मंत्रिमंडळ निर्णय - 28 नोव्हेंबर 2017 - माहिती तंत्रज्ञान विषयक सर्व बाबींची खरेदी आता गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस वेबपोर्टलमार्फत

मुंबई ( २८ नोव्हेंबर ) : विविध वस्तू व सेवांप्रमाणे राज्यातील माहिती तंत्रज्ञान विषयक सर्व बाबींची खरेदीही केंद्र शासनाने विकसित केलेल्या गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) या वेबपोर्टलच्या माध्यमातून करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे या विभागाच्या राज्यातील खरेदीसाठी राष्ट्रीय पातळीवरील पुरवठादार उपलब्ध होऊन उच्च गुणवत्तेच्या वस्तू व सेवा स्पर्धात्मक दरामध्ये उपलब्ध होणार आहेत.

माहिती व तंत्रज्ञान विषयक सर्व बाबींची खरेदी करण्यासाठी गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM)ही प्रणाली स्वीकारण्यात आल्यामुळे राज्य शासनाच्या खरेदीदार विभागाला विविध फायदे होणार आहेत. खरेदीदार विभागास GeM पोर्टलवर वस्तूची खरेदी करताना मोठ्या प्रमाणात देशपातळीवरील पुरवठादार उपलब्ध होणार असल्याने उच्च गुणवत्तेच्या वस्तू व सेवा स्पर्धात्मक दरामध्ये उपलब्ध होणार आहेत. खरेदीची संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ व सुटसुटित होऊन ती कमी कालावधीत पूर्ण करणे शक्य होणार आहे. ही खरेदी प्रक्रिया माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानवी हस्तक्षेपाशिवाय कमी कालावधीत व कुठल्याही त्रुटीशिवाय तसेच पारदर्शक पद्धतीने पूर्ण करणे शक्य होणार आहे.

महाराष्ट्र राज्याने GeM पोर्टलद्वारे खरेदीदार विभागाला खरेदी करण्यास मान्यता दिल्याने केंद्र शासनाच्या नॅशनल पब्लिक प्रोक्युअरमेंट पॉलिसी अंतर्गत करावयाच्या सुधारणांमध्ये राज्याने आघाडी घेतलेली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget