(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); ‘के/पश्चिम’ प्रभाग क्रमांक ६२ च्‍या पोट-निवडणूक कार्यक्रमास स्‍थगिती | मराठी १ नंबर बातम्या
" />

‘के/पश्चिम’ प्रभाग क्रमांक ६२ च्‍या पोट-निवडणूक कार्यक्रमास स्‍थगिती

मुंबई ( ११ नोव्हेंबर ) : प्रभाग क्रमांक ६२ ‘के/पश्चिम’ विभागाच्‍या पोट निवडणुकीच्‍या कार्यक्रमास अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त (पूर्व उपनगरे) यांच्‍या मंजुरी अन्‍वये स्‍थगिती प्राप्‍त झाली आहे.

मा. राज्‍य निवडणूक आयोग, महाराष्‍ट्र यांनी प्रभाग क्रमांक २१ ‘आर/दक्ष‍िण’ विभाग आणि प्रभाग क्रमांक ६२ ‘के/पश्चिम’ विभागाच्‍या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. तथापि, प्रभाग क्रमांक ६२ ‘के/पश्चिम’ विभागाचा पोट निवडणूक कार्यक्रम मुंबई उच्‍च न्‍यायालयाने रिट याचिका लॉजिंग क्रमांक २८७६ / २०१७ मध्‍ये प्रभाग क्रमांक ६२ मध्‍ये लघुवाद न्‍यायालय, मुंबई येथे प्रलंबित असलेल्‍या निवडणूक याचिका क्रमांक २९ / २०१७ मध्‍ये अंतिम निर्णय होईपर्यंत त्‍या रिक्‍त पदाची निवडणूक घेण्‍यात येऊ नये असे आदेश दिलेले आहेत.

त्‍या अनुषंगाने प्रभाग क्रमांक ६२ ‘के/पश्चिम’ विभागाचा पोट निवडणूक कार्यक्रम लघुवाद न्‍यायालयाच्‍या पुढील आदेशापर्यंत स्‍थगित करण्‍यात येत आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget