महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर अचानक पालिका मुख्‍यालयाच्‍या वाचनालयात

मुंबई ( ३ नोव्हेंबर ) : मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज पालिका मुख्‍यालयातील नवीन विस्‍तारित इमारतीच्‍या पहिल्‍या मजल्‍यावरील महापालिकेच्‍या वाचनालयाला अचानक भेट दिली. या भेटीने वाचनालयातील कर्मचारी महापौर थेट वाचनालयात अवतरल्‍याने अवाक झाले.

महापालिका मुख्‍यालयातील नवीन विस्‍तारित इमारतीच्‍या पहिल्‍या मजल्‍यावर नगरसेवक / नगरसेविकांसाठी वाचनालयाची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे. या वाचनालयाला ऐतिहासिक पार्श्‍वभूमी आहे. नगरसेवक / नगरसेविका नागरी सेवा-सुविधा नागरिकांना व्‍यवस्थित मिळाव्‍यात, याकरीता लोकप्रतिनिधी महापालिकेच्‍या वाचनालयात नियमित येऊन विविध विषयांवर असलेल्‍या पुस्तिकेचे वाचन करतात. यासोबतच महत्‍त्वाचे विषय लक्षात घेऊन संदर्भ ग्रंथांचे विस्‍तृत वाचन करण्‍यासाठी नगरसेवक / नगरसेविका ग्रंथ / शासन निर्णय अधिनियमांची पुस्तिका आपल्‍या निवासस्‍थानी मुदतीच्‍या कालावधीसाठी घेऊन जातात.

महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज (दिनांक ०३ ऑक्‍टोबर, २०१७) सकाळी अकस्‍मात मुख्‍यालयातील वाचनालयात दाखल होऊन वाचनालयातील विविध ग्रंथसुचींची पाहणी केली. तसेच ग्रंथालयात आणखी आवश्‍यक असेल असे ग्रंथ उपलब्‍ध करावे, असे निर्देशही दिले. महापौरांनी स्‍वतः ग्रंथालय सुचीतील महाराष्‍ट्र शासन झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मुलन (सुधारणा, निर्मुलन आणि पुर्नविकास) अधिनियम विश्‍व हे पुस्तिका क्रमांक १३ व महाराष्‍ट्र अधिनियम – १९६६ हे पुस्‍तक वाचनासाठी घेतले. महापालिका चिटणीस प्रकाश जेकटे यांनी महापौरांनी घेतलेले पुस्‍तक नोंदवहीत नोंद करुन त्‍यांची स्‍वाक्षरी घेतली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget