(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); कानगावातील शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मराठी १ नंबर बातम्या
" />

कानगावातील शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

मुंबई ( २१ नोव्हेंबर ) : मुंबई, दि. 21 : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासन पूर्ण सकारात्मक आहे. म्हणूनच शेतकरी कर्जमाफीसह इतर विविध निर्णय शासनाने घेतले असून यापुढील काळातही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यास शासन तयार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यास शासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

कानगाव (ता. दौंड, जि. पुणे) येथील शेतकरी विविध मागण्यांसाठी संपावर आहेत. या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य शासनाने शेतकरी कर्जमाफीसारखा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. एकही पात्र लाभार्थी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही. शेतकऱ्यांना पुरेशी वीज मिळावी यासाठी सोलर फिडरची योजना हाती घेण्यात आली आहे. दीड वर्षात सगळे फिडर सोलरवर आणून शेतकऱ्यांना अखंडीत वीजपुरवठा करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांवरही शासन पूर्ण सकारात्मक आहे. त्यातील अनेक मागण्या पूर्ण झाल्या असून इतर प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्यास शासन कटीबद्ध आहे. त्यामुळे कानगाव येथील शेतकऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, दौंडचे आमदार राहूल कूल, कानगावचे सरपंच संपत कडके, उपसरपंच बापुराव कोऱ्हाळे, भानुदास शिंदे, ॲड. भास्कर फडके आदी मान्यवर उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget