(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); 26 नोव्हेंबर रोजी संविधान दौड | मराठी १ नंबर बातम्या
" />

26 नोव्हेंबर रोजी संविधान दौड

मुंबई ( २३ नोव्हेंबर ) : संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो. यावर्षी संविधान दिनानिमित्त वरळी सी-फेस ते चैत्यभूमी, दादर पर्यंत ‘संविधान सन्मान दौड’चे आयोजन करण्यात आले आहे.

संविधान सन्मान दौड 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वा. जे. जे. कपूर चौक, वरळी येथून सुरु होणार असून ती चैत्यभूमी येथे समाप्त होणार आहे. प्रारंभी संविधान प्रस्ताविकेचे सामुदायिक वाचन होणार आहे. या दौडमध्ये विविध शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, एनसीसीचे विद्यार्थी, स्काऊट तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहे.

गेल्या वर्षी नागपूर येथे 1 लाख 25 हजार विद्यार्थ्यांनी एकाचवेळी संविधानाचे सामुहिक वाचन करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आगळी वेगळी मानवंदना दिली होती. या वर्षी मुंबईत संविधान सन्मान दौड आणि गौरव यात्रा आयोजित करण्यात आली आहे. दौडमध्ये सहभाग घेण्यासाठी मोफत ऑनलाईन नोंदणीसाठी www.runindia.in/events/2017 येथे करता येईल. संविधान सन्मान दौड आणि गौरव यात्राचे आयोजन समता प्रतिष्ठान, बार्टी, समता परिषद मुंबई, परिवर्तन फाऊंडेशन यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget