(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); उदयकुमार शिरुरकर यांचा सोलापुर स्ट्रीट येथील अनधिकृत बांधकामांवर हातोडा | मराठी १ नंबर बातम्या
" />

उदयकुमार शिरुरकर यांचा सोलापुर स्ट्रीट येथील अनधिकृत बांधकामांवर हातोडा

मुंबई ( २७ नोव्हेंबर ) : बी वार्ड चे सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांची अनधिकृत बांधकाम विरोधातील कारवाई आजही सुरुच आहे. सोमवारी त्यांनी वाडीबंदर येथील सोलापुर स्ट्रीट येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली.

सोलापुर स्ट्रीट येथील २५० बाय ६० चौरस फुटाच्या रस्त्यावर अनधिकृत बटरखाने, गॅरेज आणि झोपड्यांची बांधकामे करण्यात आलेली होती. हा भुखंड ही मुंबई पोस्ट ट्रस्टने पालिकेकडे हस्तांतरित केलेला आहे. पण अनधिकृत बांधकामांमुळे येथून ये जा करणे अवघडच होते.

याच अनधिकृत बांधकामांवर शिरुरकर यांनी कारवाई केली. या कारवाईत सहाय्यक अभियंता अतुल कोल्हे, कनिष्ठ अभियंता सचिन खरात आणि २० कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. आता पुन्हा येथे अनधिकृत बांधकाम उभे राहू नये म्हणून कुंपन घालण्यात येणार आहे, असे शिरुरकर यांनी सांगितले. 

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget