मुंबई ( ३० नोव्हेंबर ) : भीम आमीॅचे संस्थापक अॅड. चंद्रशेखर आझाद यांच्याविरोधात लावण्यात आलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा काढून घेण्यात यावा, कोपर्डीतील पिडीत भगिनीला जो न्याय मिळाला, तोच न्याय खैरलांजी हत्याकांडातील नराधम आरोपींना लागू करून फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने न्यायालयात अपील करावे, खर्डा येथील नितीन आगे या युवकाच्या जातीय हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी पुन्हा साक्षीदार, आरोपींची कसून चौकशी करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी येत्या ५ डिसेंबर रोजी मुंबईत राज्य व केंद्र सरकार विरोधात भीम आमीॅचा 'जवाब दो मोर्चा' दुपारी १२वाजता आझाद मैदानावर काढण्यात येणार आहे.
दरम्यान, ६ डिसेंबर २०१७ रोजी डाॅ, बाबासाहेब आंबेडकर यांना चैत्यभूमीवर अभिवादन करण्यात आल्यानंतर अॅड. चंद्रशेखर आझाद यांच्या सुटकेसाठी भीम आमीॅतर्फे सह्यांची व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे. 'जवाब दो मोर्चा' मध्ये विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नवी मुंबई, पालघर जिल्हयातील कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती भीम आर्मीचे कोअर कमिटी प्रमुख राजू झनके यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा