(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात ग्रंथोत्सवाचे आयोजन | मराठी १ नंबर बातम्या
" />

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात ग्रंथोत्सवाचे आयोजन

मुंबई ( १४ नोव्हेंबर ) : उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत ग्रंथालय संचालनालयामार्फत ग्रंथोत्सव 2017 चे आयोजन करण्यात येत आहे. मुंबई जिल्हा ग्रंथालय कार्यालयामार्फत 17 आणि 18 नोव्हेंबर असे दोन दिवस या ग्रंथोत्सवाचे आयोजन मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय येथे करण्यात आले आहे.

ग्रामीण शहरी भागातील लोकांमधील वाचन संस्कृतीमध्ये वाढ व्हावी या हेतूने राज्य शासनातर्फे ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ग्रंथ प्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावेत तसेच प्रकाशक आणि ग्रंथ विक्रेता यांना ग्रंथ विक्रीसाठी एकाच ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी, हा ग्रंथ महोत्सव आयोजनाचा मुख्य उददेश आहे. याकरिता शासन पातळीवरील प्रयत्नांचा भाग म्हणून प्रतीवर्षी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

मुंबईत दोन दिवस चालणाऱ्या ग्रंथोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाचन संस्कृती रुजावी, ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ, साहित्य व वाड्:मय विषयक पुस्तके उपलब्ध व्हावीत त्याचबरोबर प्रकाशक आणि ग्रंथ विक्रेत्यांना ग्रंथ विक्रीसाठी एकाच ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी या हेतूने ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या ग्रंथोत्सवाचा लाभ मुंबई परिसरातील जनतेने, वाचकांनी, लेखक, साहित्यिक, पत्रकार, विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक, संशोधक, अधिकारी व कर्मचारी यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget