(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मंत्रिमंडळ बैठक : 21 नोव्हेंबर 2017 : आदिवासी विकास महामंडळ अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी नियुक्तीच्या निकषात बदल | मराठी १ नंबर बातम्या
" />

मंत्रिमंडळ बैठक : 21 नोव्हेंबर 2017 : आदिवासी विकास महामंडळ अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी नियुक्तीच्या निकषात बदल

मुंबई ( २१ नोव्हेंबर ) : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्याच्या प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे महामंडळाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी आता आदिवासींच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकासासाठी उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तीचीही नियुक्ती करता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाची स्थापना 1972 मध्ये सहकारी संस्था अधिनियमानुसार करण्यात आलेली आहे. आदिवासी समुहातील शेतकरी, कारागीर, भूमीहीन मजूर आदींचा विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने हे महामंडळ स्थापन करण्यात आले असून त्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात. या महामंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद हे पदसिद्ध असून त्यावर अनुक्रमे आदिवासी विकास मंत्री आणि आदिवासी विकास राज्यमंत्री यांची निवड करण्यात येते. या महामंडळाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी आदिवासी विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीचीही निवड व्हावी या उद्देशाने महामंडळाच्या संरचनेमध्ये बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार पोटनियमात दुरुस्ती करून महामंडळाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या पदावर आदिवासी विकास विभागाचे मंत्री आणि याच विभागाचे राज्यमंत्री यांच्यासह आदिवासी विकासाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याची नियुक्ती करणे शक्य होणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget