(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मंत्रिमंडळ निर्णय - 28 नोव्हेंबर 2017 - कृषीपंपांना थ्री फेज वीज पुरवठ्यापोटी महावितरणला अनुदान देण्यास मान्यता | मराठी १ नंबर बातम्या
" />

मंत्रिमंडळ निर्णय - 28 नोव्हेंबर 2017 - कृषीपंपांना थ्री फेज वीज पुरवठ्यापोटी महावितरणला अनुदान देण्यास मान्यता

मुंबई ( २८ नोव्हेंबर ) : राज्यात ऑगस्ट 2016 दरम्यान झालेल्या अत्यल्प पावसामुळे शेती क्षेत्राचे नुकसान होऊ नये म्हणून शेतीला उपलब्ध पाणीसाठा मिळण्यासाठी कृषीपंपांना 12 तासांचा थ्री फेज वीज पुरवठा करण्यात आला होता. यासाठी महावितरण कंपनीकडून झालेल्या खर्चापोटी आवश्यक अनुदान देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

राज्याला 2014-15 व 2015-16 या दोन्ही वर्षी अत्यल्प पावसामुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यानंतर 2016 मध्ये जून व जुलै दरम्यान झालेल्या समाधानकारक पावसाने कृषी क्षेत्रामध्ये सर्वत्र समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पेरणी देखील झाली होती. मात्र, ऑगस्ट 2016 मध्ये पावसाने दडी मारल्यामुळे राज्यातील पिके करपण्याच्या मार्गावर होती. पीक हानीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागणार होते. तसेच पिकांच्या उत्पादनात प्रचंड तूट देखील निर्माण होण्याची शक्यता होती. परंतु, जून-जुलै 2016 मधील समाधानकारक पावसाने नदी-तलावांबरोबरच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तयार करण्यात आलेल्या बंधारे आणि शेततळ्यांमध्येही उपयुक्त पाणीसाठा निर्माण झाला होता.

हा पाणीसाठा शेतीसाठी वापरता येण्यासारखा असला तरी केवळ 8 ते 10 तास विजेच्या उपलब्धतेवर शेती क्षेत्राला पाणी पुरवणे अशक्य असल्याने कृषीपंपांसाठी 8 ते 10 तास वीज उपलब्धतेच्या प्रचलित धोरणात बदल करुन सलग 12 तास वीज उपलब्ध करुन देण्याची मागणी शेतकरी व लोकप्रतिनिधींकडूच वारंवार करण्यात येत होती. त्यानुसार 8 सप्टेंबर 2016 ते 15 डिसेंबर 2016 तसेच भंडारा, गोंदिया व ब्रम्हपुरी भागातील कृषीपंपांना 3 मार्च 2017 ते 15 मे 2017 या कालावधीत महावितरण कंपनीमार्फत 12 तास थ्री फेज वीजपुरवठा करण्यात आला होता. या कालावधीत करण्यात आलेल्या वाढीव वीज पुरवठ्यासाठी महावितरण कंपनीस अतिरिक्त खर्च करावा लागला. या खर्चापोटी शासनाकडून महावितरण कंपनीस आवश्यक अनुदान स्वरुपात देण्यास मान्यता देण्यात आली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget