(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); पोलीस पाटलांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक - दीपक केसरकर | मराठी १ नंबर बातम्या
" />

पोलीस पाटलांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक - दीपक केसरकर

मुंबई ( २१ नोव्हेंबर ) : पोलीस पाटलांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून लवकरात लवकर सर्व मागण्या प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज सांगितले.

राज्यातील पोलीस पाटलांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात आज बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीला पोलीस पाटील संघटनांचे प्रतिनिधी, महसूल, सामान्य प्रशासन व गृह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

केसरकर यांनी सांगितले, पोलीस पाटलांच्या मागण्यांबाबत मुख्य सचिव यांच्यासोबत चर्चा करण्यात आली आहे. मानधनात वाढ करण्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीकडून अहवाल लवकरात लवकर मागविण्यात येईल. पोलीस पाटील यांच्या मानधनातून काही रक्कम कपात करून ती निवृत्तीनंतर देता येईल का ? याबाबत पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले. नक्षलवादी हल्ल्यात मृत्यू पावलेले परंतु शासनाच्या मदतीपासून वंचित असलेल्यांना 1 लाख रुपये मदत देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्कार निवड शिफारस करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासह पोलीस अधिक्षकांना अधिकार देण्यात येतील. पोलीस पाटील यांना विभागीय आणि जिल्हास्तरावरून प्रशिक्षण देण्याबाबत त्वरित संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करावी व प्रशिक्षणाचा अहवाल कालबद्धरित्या देण्यात यावा, असे निर्देश केसरकर यांनी दिले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget