(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); चैत्यभूमी परिसरात देण्यात येणाऱ्या सुविधांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा | मराठी १ नंबर बातम्या
" />

चैत्यभूमी परिसरात देण्यात येणाऱ्या सुविधांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई ( १३ नोव्हेंबर ) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे सेवा सुविधा देण्यासाठी सर्व विभागांनी नियोजन करून अनुयायांना चांगल्या सेवा द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच या काळात इंदू मिल येथील स्मारकाच्या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा आराखडा मांडण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक झाली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांना चांगल्या सेवा देण्यात याव्यात. या काळात बाहेरून येणाऱ्या अनुयायांसाठी रेल्वेने विशेष व्यवस्था करावी, यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. शिवाजी पार्क परिसरात बार्टीमार्फत अल्पोपहार व भोजनाची सोय यंदाही करण्यात येणार आहे. या काळात या परिसरात स्वच्छता रहावी यासाठी प्रयत्न करावेत.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त यंदाही माहिती व जनसंपर्क महासंचालनायाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील चित्रपट दाखवण्यात येणार आहे. तसेच दूरचित्रवाहिनी, वृत्तपत्रे व आकाशवाणी या माध्यमांतून संदेशपर जाहिराती प्रसिद्ध करणे, जय महाराष्ट्र व दिलखुलास या कार्यक्रमात विशेष प्रसारण करणे, जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी बॅनर लावणे आदींचे नियोजन करण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

चैत्यभूमी येथे येणारे अनुयायी हे इंदूमिल येथील स्मारकाच्या जागेलाही भेट देतात. त्यामुळे तेथेही सर्व सोयी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. तसेच स्मारकाची प्रतिकृती ठेवण्यास एमएमआरडीएला सांगण्यात आले आहे. तसेच स्मारकाच्या कामाचे कार्यारंभ आदेश तातडीने देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केली. बोरिवली येथील पॅगोडा येथे भेट देणाऱ्यासाठी विशेष बस व्यवस्था करण्यात येणार आहे, असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी नागसेन कांबळे यांनी समन्वय समितीच्या मागण्या सादर केल्या. समितीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सूचना पत्रिका व माहिती पुस्तिकेचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते यावेळी झाले. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार राज पुरोहित, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, पोलिस महासंचालक सतीश माथूर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता, एमएमआरडीएचे सहआयुक्त प्रवीण दराडे, कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांच्यासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कांबळे, उपाध्यक्ष महेंद्र साळवे, रवी गरुड, भदंत करुणानिधी थेरो यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget