(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); बेल्जियमचे राजा आणि राणी यांचे राज्यपालांनी केले स्वागत | मराठी १ नंबर बातम्या
" />

बेल्जियमचे राजा आणि राणी यांचे राज्यपालांनी केले स्वागत

मुंबई ( ९ नोव्हेंबर ): महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज राजभवन, मुंबई येथे बेल्जियमचे किंग फिलिप्पे आणि क्वीन माथिल्दे यांची भेट घेतली. बेल्जियम किंग यांच्या समवेत वरिष्ठ मंत्री व व्यवसाय प्रतिनिधीमंडळ होते. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव सुमित मल्लिक, आदी यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना किंग फिलिप्पे म्हणाले, हीरा व्यापार क्षेत्रात इंडो-बेल्जियम चांगली वणिज्यिक कामगिरी होत आहे. बेल्जियम निर्यातीचे प्रमाण 80 टक्क्यांहून अधिक प्रमाणावर वाढले अहे. दोन्ही देशातील व्यापार वाढविण्यासठी तसेच गुंतवणुकीचा विस्तार वाढवून बेल्जियम व भारत यांच्यातील आर्थिक संबंध आणखी मजबूत करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी दिले.

राज्यातील स्वच्छ ऊर्जा, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी, उच्च शिक्षण, कौशल्य विकास आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रात महाराष्ट्र आणि बेल्जियम यांच्यातील सहकार्य वाढावे, अशी अपेक्षा राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी व्यक्त केली. 

हिरे उद्योग संबंधित अभ्यासक्रम विद्यापीठांतर्गत राबविण्यास मदत करावी- मुख्यमंत्री
राज्यात हिरे उद्योगाशी संबंधित अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठ स्थापना करण्याचे संकल्पित असून यासाठी बेल्जियमने सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंग फिलिप्पे यांच्याशी बोलतांना म्हणाले.

राज्यातील विविध उपक्रमांबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले, मेट्रो रेल, मोनो रेल, एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प, कोस्टल रोड, मुंबई ते नवी मुंबई सागरी लिंक, रो -रो सेवा, इत्यादीसारख्या पायाभूत सुविधांची निर्मिती होत आहे. मुंबई आणि उपनगरीय रेल्वे आणि बसेसवरील वाहतुकीचे ओझे कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची अंमलबजावणी तसेच स्मार्ट सिटी मिशनची योजना राबविण्यासाठी बेल्जियमचे सहकार्य घेण्यात येईल.

किंग फिलिप्पे आणि त्यांच्या शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ आयोजित भोजन समारंभास राज्यपालांच्या पत्नी विनोधा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget