(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मंत्रिमंडळ निर्णय - 28 नोव्हेंबर 2017 - महाराष्ट्र उद्वाहन, सरकते जिने व चलित पथ विधेयकाच्या मसुद्यास मान्यता | मराठी १ नंबर बातम्या
" />

मंत्रिमंडळ निर्णय - 28 नोव्हेंबर 2017 - महाराष्ट्र उद्वाहन, सरकते जिने व चलित पथ विधेयकाच्या मसुद्यास मान्यता

मुंबई ( २८ नोव्हेंबर ) : महाराष्ट्र उद्वाहन अधिनियम-१९३९ रद्द करुन त्याऐवजी महाराष्ट्र उद्वाहन, सरकते जिने व चलित पथ अधिनियम-२०१७ हा नवीन अधिनियम करण्यासाठी विधेयकाचा मसुदा विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात मांडण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

राज्यात महाराष्ट्र उद्वाहन अधिनियम-१९३९ नुसार उद्वाहनाची उभारणी आणि चालविण्याची परवानगी देण्यात येते. उद्वाहन क्षेत्रामध्ये नवीन तंत्रज्ञान आले असून त्यामुळे अत्याधुनिक उद्ववाहने (lifts), सरकते जिने (escalators), चलित पथ (moving walk) यांचा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ लागला आहे. उद्वाहन अधिनियमामध्ये काळानुरुप सुधारणा करण्यासह त्यांच्या निरीक्षणासाठी तरतूद करण्याच्यादृष्टीने शासनाने 9 डिसेंबर 2016 च्या आदेशान्वये मुंबई येथील मुख्य विद्युत निरीक्षक आणि विविध उद्ववाहन कंपन्यांच्या प्रतिनिधींची समिती नेमली होती. या समितीने महाराष्ट्र उद्वाहन, सरकते जिने व चलित पथ अधिनियम-२०१७ चा मसुदा सादर केला आहे.

बदलत्या तंत्रज्ञानानुसार भारतीय मानक संस्थेने ठरवून दिलेल्या मानांकांशी‍ संलग्न असा हा मसुदा तयार करण्यात आला आहे. यामुळे वेळोवेळी अद्ययावत होणाऱ्या मानकांनुसार अधिनियमात वारंवार बदल करावयाची आवश्यकता राहणार नाही. नवीन तंत्रज्ञानानुसार विकसित उद्ववाहने,सरकते जिने, चलित पथ यांची उभारणी, देखभाल आणि सुरक्षितता, उपाययोजना, निरीक्षण शुल्क,विमा संरक्षण, शासनाला मिळणारा महसूल इत्यादी तरतुदींचा विचार यामध्ये करण्यात आला आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget