मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात गठीत उपसमितीची बैठक संपन्न

मुंबई ( ७ नोव्हेंबर ) : मराठा मोर्च्याच्या विविध मागण्यांसंदर्भात गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मंत्रालयात संपन्न झाली. यावेळी यापूर्वी झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आलेल्या विविध विषयांचा आढावा घेवून सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत कोपर्डी प्रकरण, छत्रपती शाहू महाराज योजना, मराठा समाजाकरिता वसतिगृहाच्या बांधकामासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये भूखंड देणे, वसतिगृहांसाठी भाडे, सारथी संस्था, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून शेतक-यांच्या 3 लाख मुलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण योजना राबविणे, वैयक्तिक व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, एफपीयू योजना, या विषयांचा आढावा घेवून चर्चा करण्यात आली. बैठक महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समितीचे सदस्य शिक्षण मंत्री विनोद तावडे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, सहकार मंत्री सुभाष देशमुख, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी.के.जैन, सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या सुचिता भिकाने तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget