(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); जानेवारी 2018 मधील मराठी भाषा निम्नस्तर परीक्षा जुन्या अभ्यासक्रमानुसार | मराठी १ नंबर बातम्या
" />

जानेवारी 2018 मधील मराठी भाषा निम्नस्तर परीक्षा जुन्या अभ्यासक्रमानुसार

मुंबई ( १४ नोव्हेंबर ) : महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेल्या अमराठी भाषिक अराजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा निम्नस्तर व उच्चस्तर परीक्षा दि. 7 जानेवारी 2018 रोजी मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद या चार विभागीय ठिकाणी घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी कर्मचाऱ्यांना विहित नमुन्यात आपले अर्ज विभाग प्रमुख /कार्यालय प्रमुख यांच्यामार्फत संबंधित विभागीय कार्यालयांकडे दि. 5 डिसेंबर 2017 पर्यंत करता येणार आहेत.

अमराठी भाषिक राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी एतदर्थ मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी मराठी भाषा निम्नस्तर व उच्चस्तर परीक्षा दि. 21 जानेवारी 2018 रोजी मुंबई केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विहित नमुन्यातील आपली आवेदपत्रे विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांच्यामार्फत दि. 13 डिसेंबर 2017 पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

मराठी भाषा निम्नस्तर व उच्चस्तर परीक्षेसाठी विभागीय संपर्क कार्यालय तसेच भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य, प्रशासकीय इमारत, 5 वा मजला, डॉ.आंबेडकर उद्यानाजवळ, शासकीय इमारत, वांद्रे (पूर्व), मुंबई-400 051. दूरध्वनी क्र.022- 26552184 आणि 022- 26417265 येथे संपर्क करावा. मुंबई व कोकण विभागातील अर्ज विभागीय सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, कोकण भवन, 3 रा मजला, नवी मुंबई-400614, दूरध्वनी क्र.022-27573542 येथे पाठविता येतील. पुणे व नाशिक विभागात राहणाऱ्यांना या परीक्षेसाठीचे अर्ज विभागीय सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, नवीन मध्यवर्ती इमारत, 2 रा मजला, पुणे-411001, दूरध्वनी क्र. 020-26121709 येथे करता येईल. तर नागपूर व अमरावती विभागात राहणारे विभागीय सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, प्रशासकीय इमारत, 2 रा मजला, सिव्हिल लाईन्स, नागपूर-440001, दूरध्वनी क्र. 0712-2564956 येथे तर औरंगाबाद विभागासाठी विभागीय सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, जुने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर, औरंगाबाद-431001, दूरध्वनी क्र. 0240-2361372 येथे अर्ज करता येतील.

राजपत्रित अधिकारी आणि अजरापत्रित कर्मचाऱ्यांची जानेवारी 2018 मधील मराठी भाषा निम्नस्तर परीक्षा (प्रश्नपत्रिका क्रंमाक 1) जुन्या अभ्यासक्रमावर म्हणजे इयत्ता नववीचे मराठी वाचनपाठ (द्वितीय भाषा, मे 2012 चे प्रकाशन) या पुस्तकावर आधारीत असेल.

परीक्षेसंबंधात अधिक माहिती आवश्यक असल्यास उपरोक्त संबंधित विभागीय सहायक भाषा संचालक यांच्याशी किंवा भाषा संचालक यांच्याशी दूरध्वनी क्र. 022- 26552184 वर संपर्क साधावा असे आवाहन भाषा संचालक यांनी प्रसिध्दीपत्रकादवारे केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget