व्यवसाय विकास कक्षाच्या शशी बाला व अभियंता संजय निर्मळ 'ऑफीसर ऑफ द मंथ'

'इझ ऑफ डुइंग बिझनेस' अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात मोलाची भूमिका

महापालिका आयुक्तांनी केले श्रीमती शशी बाला व संजय निर्मळ यांच्या
कामांचे कौतुक !

मुंबई ( ३ नोव्हेंबर ) : 'इझ ऑफ डुइंग' अंतर्गत महापालिका क्षेत्रात व्यवसायस्नेहीता वाढावी आणि नागरिकांना संबंधित परवानग्या, प्रमाणपत्रे इत्यादी सुलभपणे मिळाव्यात, यादृष्टीने महापालिका अनेक स्तरावर प्रयत्न करीत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून आतापर्यंत दुकाने व आस्थापना खात्याशी संबंधित परवानग्या, आरोग्य विषयक परवानग्या, ट्रेड लायसन्स, इव्हेंट परमीशन्सबाबत कॉमन बिझनेस ऍप्लीकेशन सुरु करण्यात आले आहे. हे करण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे, त्या व्यवसाय विकास कक्षाच्या प्रमुख शशी बाला आणि इमारत बांधकाम परवानग्यांची प्रक्रियेचे सुलभीकरण करण्यात मोलाची भूमिका बजावणारे विकास नियोजन खात्यातील सहाय्यक अभियंता संजय निर्मळ यांची 'नोव्हेंबर - २०१७' साठी महिन्याचे मानकरी अर्थात 'ऑफीसर ऑफ द मंथ' म्हणून निवड करण्यात आली आहे.

महापालिका मुख्यालयातील सभागृहात आयोजित महापालिका अधिका-यांच्या मासिक बैठकी दरम्यान माननीय महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते प्रमाणपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन 'ऑफीसर ऑफ द मंथ' या बहुमानाने व्यवसाय विकास कक्षाच्या प्रमुख शशी बाला आणि विकास नियोजन खात्यातील सहाय्यक अभियंता संजय निर्मळ यांचा आज सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) आबासाहेब ज-हाड यांच्यासह महापालिकेचे सर्व संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.

जागतिक बँकेद्वारे 'इझ ऑफ डुइंग बिझनेस' बाबत मानांकन ठरविताना आपल्या देशातील मुंबई व दिल्ली या शहरांची माहिती 'आधारभूत माहिती' म्हणून घेतली गेली. हे मानांकन ठरविताना बृहन्मुंबई महानगरपालिकेने राबविलेल्या इमारत बांधकाम परवानग्यांच्या सुलभीकरण प्रकियेचा विशेषत्वाने विचार करण्यात आला आहे. यापूर्वी भारताचे जागतिक मानांकन हे एकशेतिसाव्या (१३०) क्रमांकाचे होते. या वर्षी या मानांकनात लक्षणीय सुधारणा होऊन ते शंभराव्या (१००) स्थानावर उन्नत झाले आहे. या मानांकन सुधारणेमध्ये बृहन्मुंबई महापालिकेद्वारे करण्यात आलेल्या प्रयत्नांचाही मोलाचा वाटा आहे. तर या प्रयत्नांमध्ये शशी बाला व संजय निर्मळ यांचेही योगदान आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget