(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मुंबई विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या संदर्भातील निर्णय त्वरित घ्यावा - रिबविप | मराठी १ नंबर बातम्या
" />

मुंबई विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या संदर्भातील निर्णय त्वरित घ्यावा - रिबविप

मुंबई ( २८ नोव्हेंबर ) : मुंबई विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या संदर्भातील निर्णय येत्या ६ डिसेंबरच्या आत त्वरित घ्यावा, अन्यथा रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु, कुलसचिव व शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे मुंबई अध्यक्ष सचिन बनसोडे यांनी दिला आहे.

याबाबत संघटनेच्या वतीने कुलगुरु यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती बनसोडे यांनी दिली.

दरम्यान, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा लंडन स्कुल ऑफ इकोनॉमिक्स मध्ये उभारला जातो. येथे त्यांचा अभ्यासक्रम ही शिकविला जातो. परंतु ज्या भारतात बाबसाहेब जन्मले, ज्या भारताचा त्यांनी संविधान लिहिले. ज्या मुंबई विद्यापीठात त्यांनी शिकविण्याचे काम केले. त्या मुंबई विद्यापीठाने आजपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकराचा पुतळा उभारलेला नाही, अशी खंत रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे यांनी प्रकट केली.

लंडन येथील लंडन स्कुल ऑफ इकोनॉमिक्स येथे आयोजित संविधान दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी दैनिक सम्राटचे संपादक बबन कांबळे आणि युनायटेट बुध्दिस्ट फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश कांबळे ही उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget